प्रेक्षकांमध्ये भोजपुरी गाण्यांची जबरदस्त क्रेझ आहे. ही गाणी यूट्यूबवर रिलीझ होताच, जोरदार व्हायरल होऊ लागतात. दरवेळी भोजपुरी प्रेक्षकांकडून या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद आणि प्रेम मिळते. भोजपुरी इंडस्ट्रीचा ट्रेंडिंग स्टार राकेश मिश्रा याचे नुकतेच आलेले ‘राजा जवान हम लइका’ हे मजेदार गाणे ब्लॉकबस्टर ठरले आहे. हे गाणे मागील वर्षी भोजपुरी वर्ल्डवाइड रेकॉर्डच्या यूट्यूब चॅनलवर रिलीझ केले होते, ज्याला आतापर्यंत ८ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
राकेश मिश्रा या नव्या गाण्यात, भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेसोबत गमतीशीरपणे छेडछाड करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना पसंतीस उतरली आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे रिलीझ झाल्यापासून हे गाणे यूट्यूबवर प्रचंड व्हायरल होत आहे.
गाण्यामध्ये राकेश मिश्रासोबत आकांक्षा दुबेची जोडी पाहायला मिळत आहे. तिथे आकांक्षाचा जबरदस्त डान्स आणि तिच्या बोल्ड अदा प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत, तर राकेशच्या भोळेपणावर देखील चाहते फिदा झाले आहेत.
गाण्याला राकेश मिश्राने त्याच्या खास अंदाजात गायले आहे. गाण्याचे बोल छोटन मनीष यांचे आहेत आणि संगीत एडीआर आनंद यांनी दिले आहे. या गाण्याची संकल्पना मनीष जी गोसाईपूर यांची असून, व्हिडिओ दिग्दर्शक रवी पंडित आहेत.
राकेश मिश्राने यापूर्वी आपल्या मधूर आवाजाने भोजपुरी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे आणि आता तो आपल्या शानदार अभिनयाने भोजपुरी बॉक्स ऑफिसवर धमाल करताना दिसत आहे. राकेशचा प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर राडा करतो. भोजपुरी प्रेक्षकांमध्ये आता राकेश मिश्राने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय गाणे हिट होण्यासाठी त्याचे केवळ नावच पुरेसे आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अंकिताच्या बॅकलेस गाऊनमधील हॉट आणि बोल्ड लूकने चाहते घायाळ, सोशल मीडियावर फोटोंचा धुुमाकूळ