Monday, July 1, 2024

हॉटनेसचा तडका! अरविंद अकेला कल्लूचे नवीन गाणे रिलीझ; महिमाच्या घायाळ करणाऱ्या अदांनी गाण्याला चार चाँद

भोजपुरी गायकांनी आपल्या गाण्यांचा सध्या सपाटाच लावला आहे. ते दरदिवशी नवनवीन गाणे प्रदर्शित करत चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत. या गायकांपैकीच एक म्हणजे अरविंद अकेला कल्लू होय. त्याचे जवळपास सर्वच गाणे सुपरहिट ठरतात. अशातच आता पुन्हा एकदा त्याचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्याचे हे गाणे प्रदर्शित होताक्षणीच धुमाकूळ घालत आहे. यूट्यूबवरही या गाण्याला जबरदस्त व्ह्यूज मिळत आहेत. (Bhojpuri Star Arvind Akela Kallu And Mahima New Romantic Song Raja Abhi Bachna Bani)

अरविंद अकेला कल्लूच्या नवीन गाण्याचे नाव ‘राजा अभी बचना बानी’ हे आहे. या भोजपुरी गाण्यात अरविंदसोबत भोजपुरी अभिनेत्री महिमादेखील आपला जलवा दाखवत आहे. दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. एकीकडे अरविंदच्या गाण्याची स्टाईल आणि दुसरीकडे महिमा आपल्या हॉटनेसचा तडका लावत आहे. तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी या गाण्याला चार चाँद लावले आहेत.

महिमा निळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. या रोमँटिक गाण्यात अरविंद आणि महिमाची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. या गाण्याचे लिरिक्स आशुतोष तिवारीने लिहिले आहेत. याव्यतिरिक्त या गाण्याला आर्या शर्माने म्युझिक दिले आहे.

हे गाणे म्युझिक वाईडच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. काही तासांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला ७० हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ६ हजारांपेक्षा अधिक लाईक्स आणि ३०० पेक्षा अधिक कमेंट्स या व्हिडिओला मिळाले आहे.

नुकतेच अरविंद अकेला कल्लूचे आणखी एक गाणे ‘ए दुल्हा महाराज’ प्रदर्शित झाले होते. या गाण्यानेही धुमाकूळ घातला होता. या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अरविंदसोबत तृषाकर मधु दिसत आहे.

तृषाकर सध्या भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये धमाल करत आहे. यातील अरविंद आणि तृषाकरची जोडीही चाहत्यांना पसंत पडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

हे देखील वाचा