Friday, July 12, 2024

करीनाच्या ‘या’ गाण्याचे भोजपुरी व्हर्जन चाहत्यांच्या भेटीला, रितेश अन् वर्षाची केमिस्ट्री वेधतेय लक्ष

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील दमदार गायक रितेश पांडे त्याच्या उत्कृष्ट गायन आणि अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा कोणताही व्हिडिओ आला की, युट्यूबवर एकच धुमाकूळ घालताे. चाहते त्याच्या नवीन गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. आजकाल भोजपुरीमध्ये हिंदी रिमेकला फार प्रसिद्धी मिळत आहेत. नेहमी कोणत्या ना कोणत्या गाण्याचे भोजपुरी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अशातच रितेशने बॉलिवूडची ‘बेबो’ म्हणजेच करीना कपूर आणि अक्षय कुमार यांचा ‘लाल घाघरा’ या गाण्याचे भोजपुरी व्हर्जन आणले आहे. यामध्ये अभिनेत्याने दिल्लीतील मॉडेल वर्षा पंत हिच्यासोबत उत्कृष्ट अभिनय सादर केला आहे. दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे.

‘लाल घाघरा’ या भोजपुरी गाण्याचा व्हिडिओ VYRL या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रितेश पांडे (Ritesh Pandey) आणि अभिनेत्री वर्षा पंत (Varsha Pant) जबरदस्त डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षा एक भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल असून दिल्लीतील सर्वोत्तम कलाकार आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहेत. तिला ज्याप्रकारे ‘भोजपुरीची शकीरा’ म्हटले जाते. कारण, ती तिच्याप्रमाणे ती सुंदर आहे. रितेशनं तिचा या गाण्यामध्ये पुरेपूर वापर केला आहे. या गाण्यात रितेशचा जबरदस्त स्वॅग पाहायला मिळत आहे. त्याची ही स्टाईल यापूर्वी कधीही दिसली नसल्याने प्रेक्षकांना अधिक आकर्षित करीत आहे. हे गाणे बॉलिवूड शैलीत तयार करण्यात आले आहे.

त्याचवेळी, करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचे हिंदीतील ‘लाल घाघरा’ (Laal Ghaghara) हे गाणे भोजपुरीमध्ये ‘लाल घघरी’ आहे. त्यामुळे दाेन्ही गाण्याचे पहिले बोल एकच आहेत. मात्र, भोजपुरी गाण्याचे बाकीचे बाेल पूर्णपणे वेगळे असून त्याचे संगीतही त्यापेक्षा खूप वेगळे आहे. तरीदेखील हे गाणे प्रदर्शित हाेऊन फार काळ झाला नसला, तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या गाण्याला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 8 हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

हे गाणे अलका सिंग पहाडियाने रितेश पांडेसोबत गायले असून वर्षा पंत हिच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. याचे गीत बिट्टू विद्यार्थी यांनी लिहिले असून संगीत विनय विनायक यांनी दिले आहे. गाण्याचे दिग्दर्शक दीपेश गोयल असून कोरिओग्राफी अमित सियाल यांनी केली आहे. तसेच, दीपेश राखीजा, रम्मी सिंग यांनी गाण्याची निर्मिती आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोप्पा नाहीये सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा सिनेप्रवास; वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी दिले होते ऑडिशन
बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वाढवला इंटरनेटचा पारा, ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांनाही घातली भुरळ
साऊथच्या अभिनेत्रीने निर्मात्याशी थाटला संसार; नवरदेवाला पाहताच नेटकरीही म्हणाले, ‘हे कसं शक्य?’

हे देखील वाचा