काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते. हा नियम सर्वच क्षेत्रांसाठी लागू असतो. तसेच चित्रपटसृष्टीसाठी देखील लागू आहे. आता चित्रपटांबद्दल सांगायचे झाले, तर पूर्वी फक्त हिंदी सिनेमांबद्दलच चर्चा व्हायच्या. मात्र, आता हिंदी सिनेमांइतकेच महत्त्व प्रादेशिक चित्रपट आणि प्रादेशिक संगीताला प्राप्त झाले आहे. मराठी, हिंदी सोबतच आता भोजपुरी सिनेमांच्या आणि गाण्याच्या चर्चा देखील रंगायला लागल्या आहेत. भोजपुरी गाण्यांनी त्यांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.
भोजपुरी भाषेतील प्रदर्शित होणारी सर्व गाणी सुपरहिट होतातच. आता ‘ललिया के गलिया’ या गाण्याचेच बघा ना. भोजपुरी सिनेमातील सुपरस्टार पवन सिंग याचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर धूम माजवत आहे. ‘ललिया के गलिया’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर फक्त एकाच दिवसात या गाण्याला ३० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की, हे गाणे पुढे अजून किती धमाल करेल.
चटक भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, ३३ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स आणि ५०० पेक्षाही अधिक कमेंट्स या गाण्याला मिळाल्या आहेत. शिवाय हे गाणे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे गाणे पवन सिंग आणि अनुपमा यादव यांनी गायिले असून गाण्याचे बोल कुंदन पांडे आणि अर्जुन अकेला यांचे आहेत, तर संगीत प्रियांशु सिंग यांचे आहे. या गाण्याचे संगीत सर्वांना आकर्षित करत असून, संगीत हे या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
या गाण्यात पवन सिंग एकदम देशी अवतारात आपल्याला भाजी विकताना दिसत आहे. पवन सिंग याचे या गाण्याच्या आधी देखील अनेक गाणी सुपरहिट झाली असून रेकॉर्ड सेट करणारे ठरली आहेत. ‘कसल कमरिया हो’ हे गाणे देखील तुफान गाजत आहे. ३४ वर्षीय पवन सिंग भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-देशद्रोहाच्या गुन्ह्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ; पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अभिनेत्रीची कोर्टात धाव