Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड कार्तिक आर्यनच्या भूल भुलय्या ३ चा टीझर रिलीज; बघा काय म्हणत आहेत नेटीझन्स…

कार्तिक आर्यनच्या भूल भुलय्या ३ चा टीझर रिलीज; बघा काय म्हणत आहेत नेटीझन्स…

भूल भुलैया 3‘ या चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी नुकतेच पहिले पोस्टर रिलीज करून याची पुष्टी केली. आज शुक्रवारी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून लोकांना तो खूप आवडला आहे. 

टीझर व्हिडिओ पाहिल्यानंतर, प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटात विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत कमबॅक करत आहे. मात्र, यावेळी मंजुलिका तशी नसल्याची काही लोकांची तक्रार आहे. आणखी काय म्हणतायत नेटिझन्स? बघुयात 

‘भूल भुलैया 3’ या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या बालन व्यतिरिक्त तृप्ती डिमरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. चित्रपट पाहिल्यानंतर युजर्स म्हणत आहेत की हा धमाका यंदाच्या दिवाळीसाठी सज्ज आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात विद्या बालनचे पुनरागमन चाहत्यांसाठी एक भेट आहे असे वाटते.

मात्र, टीझर पाहिल्यानंतर काही लोक निराश झाले आहेत. या चित्रपटाकडून मला कोणतीही अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टीझर पाहिल्यानंतर काही यूजर्सचा दिवाळी सणाचा उत्साह आणखी वाढला आहे. एका यूजरने लिहिले, ‘व्वा! दिवाळी खूप छान होणार आहे. शेवटचे दोन भाग छान होते आता तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

ब्लेझर आणि शॉर्ट्समधील शेहनाझ गिलचा हॉट लुक पाहिला का? एकदा नजर टाकाच

 

हे देखील वाचा