Friday, April 26, 2024

वजन कमी करायचं? मग भूमी पेडणेकरच्या ‘या’ टिप्स फॉलो कराच, २१ किलो वजनात झालेली घट

भूमी पेडणेकरने आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनयाच्या तिच्या प्रवासासाठी ओळखली जातेच तशीच तिने स्वतःचे कमी केलेले वजन आणि स्वतः केलेला बदल याच्या प्रवासाबद्दल देखील ती ओळखली जाते.

भूमीच्या (bhumi pednekar) अभिनयाच्या कारकिर्दीला २००५ मध्ये आलेल्या ‘दम लगाके हैशा’ या सिनेमाने झाली. या सिनेमासाठी तिने स्वतःचे वजन वाढवले होते. त्यानंतरच्या तिने केलेला स्वतःमधला बदल हा हैराण करणारा आहे. एका तिने चार महिन्यांमध्ये चक्क २१ किलो वजन कमी केले होते. हे तिने केलेले ट्रान्सफॉर्मेशन हैराण करणारे होते. (bhumi pednekar loss her kg 21 weight in just 120 days)

भूमी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायची आपल्या दिवसाला सुरुवात करायची आणि पूर्ण दिवस डिटॉक्स वॉटर पीत असे. हा तिच्या डायट प्लॅनचा भाग होता. तिच्या डायट प्लॅनमध्ये सकाळी नाश्त्याला स्किम्ड मिल्क बरोबर सनफ्लावर सीड्स ती खायची. कधीकधी व्हाईट ब्रेड, एग व्हाईट ऑम्लेट, आणि फळ ती खायची.

भूमी पेडणेकरला घरचं जेवण जास्त आवडतं. दुपारच्या जेवणात पोळी, भाजी, आमटी एवढे साधे जेवण तिला जेवायला आवडतं. गव्हाच्या पोळी ऐवजी ज्वारी बाजरी त्याच्या भाकऱ्या तिला खायला आवडतात. जेवणाबरोबर टाक आणि दह्याची वाटी कधीच विसरत नाही. कधीकधी चिकन सँडविच खायला तिला नेहमीच आवडते.

रात्रीच्या जेवणामध्ये चिकन मासे खाणे ती पसंत करते. रात्रीचं जेवण ती आठ वाजताच संपवते. तिचं म्हणणं आहे जेवण पचवण्यासाठी योग्य वेळ मिळतो त्यामुळे मी आठच्या ठोक्याला जेवण करणे पसंत करते. कधीकधी नॉनव्हेजच्या जागी पनीर टोफू खाणे ती नेहमी पसंद करते.

तिच्या डायट बरोबरच ती जिममध्ये तेवढाच वर्क-आऊट करते. एक दिवस कार्डिओ आणि एक दिवस मी ट्रेनिंग ठरलेलं असतं. जिममध्ये भूमी खूप घाम गाळते. जिम बरोबरच योगा स्ट्रेचिंग देखील ती करते. जिम नंतर पाच उकडलेली अंडी हा तिचा ठरलेला आहे  आहार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा