हिंदी चित्रपटसृष्टीत बिग बी म्हणजेच दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रत्येक चाहत्याच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आज लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत अमिताभ माहिती नसलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही अमिताभ यांचे चाहते आवर्जुन पाहायला मिळतात. त्यामुळेच त्यांना सोशल मीडियावरही प्रचंड मोठा चाहतावर्ग लाभला आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कावरेबावरे होतात. अशामध्ये आपण समजू शकतो की, अमिताभ यांची सुरक्षा करणे, हे किती मोठे आव्हानात्मक आहे.
नेमका अमिताभ बच्चन यांना सुरक्षा देणारा व्यक्ती आहे तरी कोण? आज या लेखातून आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. (Big B Amitabh Bachchan Personal Bodyguard Jitendra Shinde Salary Is More Than The CTC of Several CEOS)
कोण आहे अमिताभ यांचा बॉडीगार्ड?
‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचा बॉडीगार्ड जीतेंद्र शिंदेंवर आहे. अमिताभ घरातून बाहेर पडताच जीतेंद्र आपला ऍक्टिव्ह मोड ऑन करतात आणि त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर बारीक नजर ठेवतात.
अमिताभ यांच्यासोबत राहणारे जीतेंद्र चालवतात स्वत:ची सुरक्षा एजन्सी
जीतेंद्र यांना तुम्ही अधिकतर फोटोंमध्ये अमिताभ यांच्या मागे किंवा आजूबाजूला उभे असल्याचे पाहू शकाल. मात्र, इतकी मोठी जबाबदारी सांभाळणारा जीतेंद्र शिंदे या कामासाठी नेमके मानधन तरी किती घेतात? असा प्रश्नही आता तुम्हाला पडला असेल, नाही का? माध्यमांतील वृत्तांनुसार, जीतेंद्र यांची स्वत:ची सुरक्षा एजन्सी आहे. मात्र, अमिताभ बच्चन यांना ते स्वत:च सुरक्षा देतात.
इतका आहे जीतेंद्र यांचा पगार
पब्लिक इव्हेंट्सपासून ते ‘कौन बनेगा करोड़पती’च्या सेटपर्यंत अमिताभ जिथेही जातात, तिथे जीतेंद्र त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी जीतेंद्र यांना वर्षाला १.५ कोटी रुपये पगार दिला जातो. म्हणजेच महिन्याला जवळपास १२ लाख ५० हजार रुपये पगार मिळतो.
अमिताभ बच्चन यांच्या सांगण्यावर केले होते ‘हे’ काम
खरं तर महिन्याला इतका पगार मोठमोठ्या कंपन्यांच्या सीईओंना देखील मिळत नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रसिद्ध हॉलिवूड स्टार आणि चित्रपट निर्माते एलिजा वूड यांनाही जीतेंद्र यांनीच भारतीय दौऱ्यादरम्यान सुरक्षा देण्यात आली होती. असे म्हटले जाते की, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनीच शिंदे यांना वूड यांना सुरक्षा देण्यास सांगितले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण