Saturday, March 7, 2026
Home अन्य जन्मदिनी अमिताभ यांची मोठी घोषणा! ‘पान मसाला’ ब्रँडसोबतचा करार मोडला; म्हणाले, ‘माहिती नव्हतं…’

जन्मदिनी अमिताभ यांची मोठी घोषणा! ‘पान मसाला’ ब्रँडसोबतचा करार मोडला; म्हणाले, ‘माहिती नव्हतं…’

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे आज (11 ऑक्टोबर) त्यांचा 79 वाढदिवस साजरा करत आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये जे काम केले, जे नाव कमावले, फॅन्सच्या प्रेक्षकांच्या मनात जी जागा निर्माण केली त्याला तोड नाही. आज अनेक दिग्गज कलाकार इंडस्ट्रीमध्ये आहे. मात्र, अमिताभ बच्चन या नावाला जे वलय आहे, जे वजन आहे ते इतर कोणत्याच नावाला नाही. अमिताभ यांना संपूर्ण जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे. विविध भेटवस्तू मिळत आहे. मात्र, अमिताभ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जो निर्णय घेतलाय, तो त्यांच्या फॅन्ससाठी कोणत्याही भेटवस्तू पेक्षा कमी नाही.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहीत त्यांचा हा निर्णय सर्वांना सांगितला आहे. अमिताभ यांनी ‘कमला पसंद’ या पान मसाल्यासोबत असलेला करार संपवला असून त्याची माहिती त्यांनी त्यांच्या ब्लॉगमधून दिली आहे. त्यांनी पान मसाल्याचा ब्रँड असलेल्या कमला पसंदसोबतच करार संपवला असून, फी देखील परत केली आहे.

अमिताभ यांच्या ब्लॉगमध्ये असे म्हटले आहे की, “कमला पसंद ही जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ‘कमला पसंद’च्या ऑफिसला संपर्क करून मागच्या आठवड्यात या कंपनीच्या जाहिरातीचा करार संपवला आहे. अमिताभ बच्चन हे तेव्हा या ब्रँडसोबत जोडले गेले, जेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती की, ही जाहिरात सरोगेट जाहिरातीमध्ये येते.”

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांना या ब्रॅण्डच्या जाहिरातींवरून ट्रोल करण्यात आले होते. कदाचित याच कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा करार संपवताना अमिताभ यांच्याकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावरून लक्षात येते की, त्यांना हे माहित नव्हते की, ही जाहिरात सरोगेट जाहिरात आहे.”

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन हे रणवीर सिंगसोबत पण मसाल्याच्या जाहिरातीमध्ये दिसले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. त्यांना अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले होते.

या प्रकरणात अँटी टोबॅको ऑर्गनाझेशनने देखील अमिताभ बच्चन यांना एक अधिकृत पत्र लिहिले होते. या पात्रात म्हटले होते की, मेडिकल रिसर्चमधून लक्षात आले की तंबाखू, पान मसाल्यासारखे पदार्थ माणसांना खासकरून तरुणांना आरोग्याला नुकसानदायी ठरत आहे. याच कारणासाठी त्यांनी ही जाहिरात करू नये.

हे देखील वाचा