Saturday, July 6, 2024

व्यायाम तर केलाच पाहिजे! अमिताभ यांच्यापासून ते करीनापर्यंत ‘या’ कलाकारांनी घरातच बनवलीये जिम

रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम करणे किती महत्वाचे आहे हे, तर सर्वांनाच माहिती आहे. दररोज व्यायाम केल्याने मोठे आजार देखील दूर होतात असे अनेक डॉक्टर सांगतात. अशात कलाकारांना सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी आपले शरीरही फिट आणि सुदृढ ठेवावे लागते. कलाकार जर दिसायला चांगले नसतील, तर त्यांना पाहिजे तसे चित्रपट मिळत नाहीत. त्यामुळे सर्वच कलाकार निरोगी राहण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी रोज जिम करतात. अशात कोरोना महामारीमुळे आणि रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक कलाकारांना जिमला जाण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या घरीच जिमचा एक छोटासा सेटअप तयार केला आहे. आज या लेखातून अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेऊयात.

अमिताभ बच्चन
वयाची सत्तरी ओलांडून देखील अभिनयात आपला पाय रोवून खंबीर पणे उभे असलेले दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे दररोज आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करतात. जिमसाठी दररोज घराबाहेर जाणे त्यांना कठीण पडत असल्याने त्यांनी आपल्या घरामध्येच एक छोटी जिम सुरू केली आहे. कामाच्या व्यस्ततेमधून वेळ मिळेल तसा ते नित्यनियमाने जिम करतात. त्यामुळे आज ७९ वय असताना देखील ते एवढे निरोगी आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

शिल्पा शेट्टी
शिल्पाला तिच्या फिगरमुळे ‘फिटनेस गर्ल’ म्हणून ओळखले जाते. तिच्या बोल्डनेसने आणि जबरदस्त फिगरने तिने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहे. सुरुवातीला बराच काळ तिने जिममध्ये जाऊनच व्यायाम केला. परंतु आता कामाच्या गडबडीमध्ये जिमसाठी वेळ मिळत नसल्याने ती घरीच जिम करते. तिने घरामध्ये एक जिम तयार केली आहे. जिमसह ती मन शांत ठेवण्यासाठी अनेक योगासने देखील करते.

वरुण धवन
कामाच्या व्यस्ततेमुळे वरुण जेवढा शक्य होईल, तेवढा वेळ घरी घालवत असतो. अशात त्याची बॉडी आणि शरीरातील लवचिकतेने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. अथक व्यायाम आणि प्रॅक्टिसमुळे त्याने आतापर्यंत अनेक गाण्यावर कमालीचा डान्स केला आहे. जिमसाठी वेळ मिळत नसल्याने तो देखील घरामध्येच व्यायाम करतो. तसेच कोरोना काळात जिम बंद असल्याने त्याने घरामध्ये जिम तयार करणे पसंत केले.

टायगर श्रॉफ
अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या डान्सने आणि अभिनयाने, तर सर्वांनाचं वेड लावले आहे. अथक परिश्रमांनी त्याने आपली दमदार शरीरयष्टी बनवली. अशात कोरोना महामारीमध्ये टाळेबंदी झाली. त्यामुळे सर्व जिम बंद होत्या. घरात बसून बनवलेली बॉडी पूर्ण उतरू लागल्याने त्याने घरामध्येच जिम करायला सुरुवात केली आहे.

प्रतीक बब्बर
आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारा प्रतीक सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. तो कायमच त्याच्या चाहत्यांबरोबर त्याचे जिमचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. कामातील व्यस्ततेमुळे त्याने देखील घरामध्येच छोटीशी जिम सुरू केली आहे. तो दररोज घरामध्येच व्यायाम करतो आणि आपले शरीर सुदृढ ठेवतो.

करीना कपूर खान
कपूर कुटुंबातील अभिनेत्री करीना सध्या दोन मुलांची आई आहे. गरोदर असताना जिमसाठी अथवा योगासाठी बाहेर जात येत नसल्याने तिने देखील घरीच व्यायाम करायला सुरुवात केली. तिच्या अभिनयासह हॉट फिगरमुळे देखील ती चाहत्यांची मने जिंकते. तिच्या जिममुळेच २ मुलांची आई असून देखील ती खूप तरुण दिसते.

अनिल कपूर
फिटनेसच्या बाबतीत अनिल कपूर देखील मागे नाहीत. ते देखील रोज नित्य नियमाने व्यायाम करतात. आपल्या वयानुसार आपल्याला वेगवेगळे आजार जडू नयेत त्यामुळे शरीर सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी देखील वेळेचे भान लक्षात घेत घरामध्येच एक छोटी जिम सुरू केली आहे.

ऋतिक रोशन
ऋतिक रोशनने आजवर अनेक ऍक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाने आणि वेगळ्या अंदाजातील डान्सने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. डान्स करताना शरीर लवचीक असणे गरजेचे असते. त्यामुळे तो देखील रोज व्यायाम करतो.

कामाच्या व्यस्ततेमुळे त्याने देखील घरामध्येच जिम बनवली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा