टीव्हीवरील सर्वात चर्चेत असणारा रियॅलिटी शो ‘बिग बॉस १४’मध्ये दररोज काहीतरी रोमांचक गोष्टी पाहायला मिळत आहेत. आता शोमधील सर्व सीनियर्स बाहेर झाले आहेत. त्यांच्यासोबतच नवीन स्पर्धक शहजाद देओलही बिग बॉस १४ च्या घरातून बाहेर पडला आहे. यानंतर त्याने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच म्हटले आहे की, त्याच्यासोबत शोमध्ये वाईट घडले आहे.
बिग बॉस १४ मधून बाहेर पडल्यानंतर शहजादने इंस्टाग्राम अकाउंटवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच त्याने चाहत्यांचेही आभार मानले आहे.
त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मला वाटले होते की, हा निष्पक्ष खेळ असेल. हा दुतर्फा मार्ग होता. परंतु हा प्रवास लवकरच समाप्त झाला. मला आनंद आहे की, लोकांनी मला खूप प्रेम दिले. जर हा निर्णय तुमच्यावर असता, तर मी आता बिग बॉसच्या घरामध्ये असतो. परंतु हेच जीवन असते. कधीच निष्पक्ष राहत नाही.”
“कदाचित हेही होणार होते. परंतु मी तुम्हाला वचन देतो की, मी नेहमीप्रमाणे तुमचे मनोरंजन करत राहील. तुमचा पंजाबी मुंडा,” असेही तो पुढे म्हणाला.
सोशल मीडियावर शहजाद देओलची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे शहजाद देओलला बिग बॉस १४ मधून एलिमिनेटेड वीकेंड वॉरवेळी करण्यात आले होते. परंतु काही दिवसांसाठी त्याला ‘गायब’चा टॅग देऊन घरात ठेवले होते. त्यानंतर आता शहजाद देओल घरातील सदस्यांच्या नामांकनाचा बळी ठरला असून घरातून बाहेर पडला आहे.
शहजादला या गोष्टीचे दु:ख आहे की, त्याला घरातील व्यक्तींनीच बाहेर केले. त्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, त्याच्याबद्दलचे सर्व निर्णय घरातील व्यक्तींच्या हातात होते. जर हे जनतेच्या हातात असते, तर तो कदाचित घरात राहिला असता.
“बिग बॉस १४ च्या घरातील व्यक्तींपेक्षा मला सर्वात जास्त त्रास सीनियर्सकडून झाला. घरातील व्यक्तींकडून मला कमी मतं मिळाली होती. परंतु जेव्हा सीनियर्सची वेळ आली, तेव्हा ते सर्व माझ्या विरोधात होते. घरातील व्यक्तींकडून मला केवळ २ मतं मिळाली. इतर सर्वांना ४-४ होते. त्यानंतर मला तिन्ही सीनियर्सने घराबाहेरचा रस्ता दाखवला. जर जनतेने बाहेर केले असते, तर मला चांगले वाटले असते,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
घरातील सीनियर्समध्ये सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांचा समावेश होता.
वाचा-
-धक्कादायक! ‘या’ कारणासाठी सिद्धार्थ शुक्ला चोरायचा वडिलांच्या खिशातून पैसे; स्वत: च केला खुलासा
-बिग बॉसच्या घरातून ‘ही’ अभिनेत्री पडणार बाहेर? दर्शक नाही तर सीनियर्स घेणार निर्णय