काय्य! बीग बॉस चौदाची विजेती रुबीना दिलैक करणार दुसऱ्यांदा लग्न, ‘हा’ व्यक्ती देणार आयुष्यभराची साथ


बिग बॉसचा सीजन जसा सुरु झाला, तशी या पर्वाचा विजेता कोण असणारा अनेक चर्चा रंगायला लागल्या. अखेर १४३ दिवसांनी बिग बॉस १४ या पर्वाच्या विजेत्याची २१ फेब्रुवारीला घोषणा झाली. टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीची नायिका रुबिना दिलयाकने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरले. पहिल्या दिवसापासून घरात प्रवेश केलेल्या रुबिनाने एक महत्वाचा वैयक्तिक उद्देश समोर ठेऊन या घरात प्रवेश केला होता.

रुबिनाने घरातून बाहेर आल्यावर एका मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टी माध्यमांसमोर ठेवल्या. जेव्हा बिग बॉसच्या घरात अभिनव शुक्ला आणि रुबिना या नवरा बायको यांनी एन्ट्री घेतली, तेव्हा त्यांचे वैवाहीक जीवन बिलकुल सुरळीत नव्हते. याच घरात त्यांनी खुलासा केला होता की, त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. परंतु कायद्यानुसार त्यांना किमान ६ महिने तरी सोबत राहावे लागेल, जेणे करून त्यांच्या हा निर्णय बदलला तर घटस्फोट स्थगित होईल.

या घरात प्रवेश केल्यानंतर रुबीनाला अनेक गोष्टी नव्याने समजल्या. अभिनव आणि रुबिनाने या घरात नव्याने एकमेकांशी ओळख करून घेतली. याबद्दल बोलताना रुबिना म्हणाली, ” खरं सांगायचे तर अभिनवमुळेच मी ‘बिग बॉस’ च्या घरात एवढे दिवस टिकू शकली. तो माझ्यासोबत असल्याने आणि त्याचा पाठिंबा असल्याने मी खंबीरपणे इतर सर्व स्पर्धकांचा सामना केला. जेव्हा सलमान खानने मला विजेती म्हणून घोषित केले, त्याच क्षणी अभिनवने धावत येऊन मला मिठी मारत शुभेच्छा दिल्या. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता.”

पुढे ती म्हणाली, “या घरात राहिल्याने मला माझा नवरा, माझे लग्न पुन्हा परत मिळाले आहे. अभिनवने जसे माझे स्वागत केले, माझ्यासाठी त्याने घरात खूप तयारी करून ठेवली होती. हे सर्व खूप भरवणारे होते. आता आम्ही पुन्हा लग्न करायचा विचार केला आहे. आम्ही डेस्टीनेशन वेडींगबद्दल विचार करत आहे. हे माझे पहिल्याच नवऱ्यासोबत दुसरे लग्न असणार आहे, आता आम्ही एकमेकांना आयुष्यभराची साथ देणार असल्याचे वचन घेणार आहोत.”


Leave A Reply

Your email address will not be published.