Friday, July 5, 2024

‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार ‘माझे मडके भरी’ नॉमिनेशन टास्क, होणार जोरदार राडा

 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल ४ ऑक्टोबरच्या प्रसारित झालेल्या भागात काही आगळवेगळं घडलं. चक्क बिग बॉस यांनी त्यांचा फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे “टेलिफोन”. जेव्हा जेव्हा या टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हनांना सामोरं जावं लागणार आहे असे बिग बॉस यांनी कालच्या भागामध्ये घोषित केले. काल घरामध्ये रंगले “चार्ज करायचा नाय” हे नॉमिनेशन कार्य, ज्यामध्ये अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादुस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये  नॉमिनेट झाले. आज घरामध्ये रंगणार आहे “माझे मडके भरी” हे उपकार्य. आता हा टास्क नक्की माझे मडके भरी आहे की दुसर्‍यांचे मडके फोडी? हे आजच्या भागामध्ये कळेलच.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज माझे मडके भरी हे उपकार्य रंगाणार आहे. घरातील भाड्यांची सुविधा जिंकण्यासाठी हे कार्य सोपवण्यात आले आहे. टीम A आणि टीम B मध्ये ही बाजी कोण मारणार ? काय काय राडे होणार ? कोणत्या टीमची मडकी फोडली जाणार ? कोण कोणाशी पंगा घेणार ? हे कळेल आजच्या भागामध्ये.

बिग बॉसच्या घरात उरलेल्या १४ स्पर्धकांमध्ये अस्तित्वासाठी जोरदार लढत सुरु आहे. प्रत्येक टास्क दरम्यान हे स्पर्धक जोरदार मेहनत करताना दिसत असून, प्रत्येक दिवसागणिक आणि टास्कनुसार यांच्यामध्ये वादही होताना दिसून येत आहे. आता सध्या बिग बॉस मराठीच्या घरात दोन ग्रुप पडलेले पाहायला मिळत आहेत. एका ग्रुपमध्ये विकास, विशाल, मीनल, अविष्कार, सोनाली आणि सुरेखा तर दुसऱ्या ग्रुपमध्ये जय, मीरा, दादूस, गायत्री, स्नेहा, अक्षय आणि उत्कर्ष दिसून येत आहेत. आता बिग बॉसकदेउं देण्यात आलेल्या या ‘माझे मडके भरी’ टास्कच्या शेवटी घरातून बाहेर जाण्यासाठी कोण नॉमिनेट होणार हे पाहणे महत्वाचे असेल. या कार्याचा एक प्रोमो सध्या टीव्हीवर दाखवला जात असून, ज्यावरून या कार्यादरम्यान घरात आणि सदस्यांमध्ये भरपूर हंगामा होणार हे नक्की दिसत आहे. या टास्क दरम्यान अजून कोणता नवा ड्रामा पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा