Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस मराठी’मध्ये सदस्य झाले शायर, तर स्नेहाने केला ‘या’ व्यक्तीच्या स्वभावातील दोषाबद्दल खुलासा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसने “जिंकू किंवा लढू” हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य म्हणून जाहीर केले. या साप्ताहिक कार्याच्या अंतर्गत काही उपकार्य सदस्यांना देण्यात येणार आहेत असे देखील सांगितले. “माझे मडके भरी” हे त्यातलेच पहिले उपकार्य होते. मात्र अक्षय आणि विशालमध्ये झालेल्या भांडणामुळे ते कार्य रद्द करण्यात आले. बिग बॉस यांनी सदस्यांना ताकीद देखील दिली अशा प्रकारच्या कृत्याचा ते निषेध करतात. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस सांगतात की, “पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता येणार नाही” त्यामुळे घरामध्ये जरा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

हा आदेश येताच सदस्य एकावर एक मजेदार वाक्य करण्यास सुरुवात करतात. गायत्री आणि तृप्ती देसाई यांनी वाक्य टाकायला सुरुवात केली. तृप्ती म्हणाल्या हारे हारे हारे… तर गायत्री म्हणाली ‘जे वापरणार बेड’ त्यावर तृप्तीताई म्हणाल्या, ‘आमची डायरेक्ट पडणार रेड’ आता सदस्यांना हे फर्निचर कसे मिळणार? त्यासाठी त्यांना आता कोणता नवा टास्क बिग बॉस देणार? हे पाहायला सर्वच उत्सुक आहे.

तर दुसरीकडे स्नेहा, सुरेखा कुडची, दादुस आणि तृप्तीताईंचा एक वेगळा स्वतंत्र गृप तयार झाला आहे. या ग्रुपला घरातला C ग्रुप म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तृप्ती ताई म्हणाल्या C फॉर क्लिअर. A च्या आणि B च्या बाजूने नसलेला असा हा C ग्रुप. या ग्रुपमध्ये एक चर्चा रंगताना दिसते. टास्कमध्ये जे काही घडले त्याबद्दल स्नेहा सांगते सोबतच ती मीराबद्दल देखील बोलते. स्नेहा हसत हसत त्यांना सांगते की, ‘मला सांगत होती त्या पेंटमध्ये पाणी टाकुया. आता तो ऑइल पेंट आहे तर त्यात पाणी कसे मिक्स होणार. तिचे जर ऐकले नाही तर तिचा लगेच तिळपापड होतो. त्यांच्यासोबत देखील तेच झाले तिचे आणि ती स्वत:चे नियम बनवत असते हे खरं आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

हे देखील वाचा