Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शेवटी आपल्या दोघांना हा दरवाजा बंद कारायचा’, म्हणत विशालने मागितली विकासाची माफी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या दुसर्‍या उपकार्यामध्ये टीम A विजयी ठरली. हरल्यामुळे आता टीम B ला बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील फर्निचर वापरता येणार नाही असे बिग बॉसने जाहीर केले आहे. आता साप्ताहिक कार्यामध्ये पणाला लागले बाथरूम या उपकार्यामध्ये कोण विजयी ठरणार हे बघणे महत्वाचे ठरेल. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अजून एक उपकार्य रंगणार आहे “फळ की निष्फळ”. यामध्ये पणाला लागणार आहेत घरामधील फळं. या उपकार्यातील विजयी टीममधील सदस्यांना घरातील फळं खाण्याची परवानगी असेल. आता या कार्यात कोण फळांची चव चाखत या कार्यात बाजी मारणार हे तर येणाऱ्या भागांमधून समजेलच.

बिग बॉस मराठीच्या येणाऱ्या भागात विशाल विकासची माफी मागताना दिसणार आहे. विशाल विकासला टास्कमध्ये काहीतरी बोलून गेला असावा त्यामुळे विकासला विशाल आपल्या मनातील गोष्ट सांगतो. विकासाशी बोलताना विशाल म्हणाला, “टास्क संपला भावा, टास्कच विषय तिथेच सोड. तुला माहिती आहे मी कसा खेळतो आणि मला माहिती आहे तू कसं खेळतोस. हा गेम इथे संपला विषय इथे सुटला. शेवटी दरवाजा बंद करून आपल्याला जायचं आहे हे लक्षात ठेव, आणि जे काही मी तुला रागाने बोललो असेल ते मला बोलण्याची इच्छा नव्हती मी माफी मागतो. हा गेम आहे. तू खूप भारी खेळतोस. तू इन्सपिरेशन आहेस माझं आणि मनात काही राग ठेऊ नकोस”.

असं काय घडलं खेळात की विशालने विकासची माफी मागितली? काय बोलून गेला विशाल विकासला ज्याचं त्याला इतकं वाईट वाटलं आहे? विकास विशालला माफ करेल? कोणती टीम जिंकेल पुढचे उपकार्ये? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’

हे देखील वाचा