Tuesday, June 24, 2025
Home टेलिव्हिजन बिग बॉस फेम शहनाज गिल भडकली मीडियावर पत्रकारावर ओरडत म्हणाली…

बिग बॉस फेम शहनाज गिल भडकली मीडियावर पत्रकारावर ओरडत म्हणाली…

अभिनेत्री शहनाज गिल सतत या ना त्या कारणामुळे लाइमलाईट्मधे असते. आपल्या चंचल स्वभावामुळे ती नेहमीच ओळखली जाते. सध्या ती तिच्या ‘देसी वाइब्स विद शहनाज गिल’ या शोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार येऊन गेले आहेत. या शोमध्ये ती येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारताना दिसत आहे. यातच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत असून, यात ती पापराजींवर चिडलेली दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलेब्रिटी पत्रकार असणाऱ्या विरल भियानी यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात शहनाज मीडियासोबत बोलताना दिसत असून, मागे खूपच आवाज आणि गोंधळ होत होता. यातच एक व्यक्ती तिच्यासोबत बोलत असताना दुसरा व्यक्ती सतत तिला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तिचा पारा चढला आणि ती भडकली. ती म्हणते, “हा अपमान आहे. मी अजून बोलत आहे. तुम्ही ऐकले पाहिजे. त्यांना सांग शांत राहा.”

शहनाजचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, आता यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी शहनाजला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिला तिच्या वागण्यावरून ट्रोल केले आहे. शहनाज बिग बॉस या शोमुळे तुफान प्रकाशझोतात आली. तिची आणि दिवंगत अभिनेता असलेल्या सिद्धार्थ शुक्लाची मैत्री देखील खूप गाजली. लवकरच शहनाज बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा