Saturday, April 20, 2024

खळबळजनक! दराेड्यात अयशस्वी झाल्यानंतर बदमाशांनी ‘या’ अभिनेत्रीची गाेळ्या झाडून केली हत्या

पश्चिम बंगालमधील हावडा येथे बुधवारी ( दि. 28 डिसेंबर)ला झारखंडमधील एका अभिनेत्रीला लुटण्यात आले. लुटमारीदरम्यान चाेरट्यांना अपयश आल्याने त्यांनी अभिनेत्री रिया कुमारीची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे, त्याचबरोबरच चोरट्यांचा शोध सुरू आहे.

अभिनेत्री रिया कुमारी (riya kumari) पती प्रकाश कुमार आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत राष्ट्रीय महामार्ग 16 वरून कोलकाताकडे जात होती. त्याचवेळी ही घटना घडली आणि हल्लेखोरांनी अभिनेत्रीवर गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी सांगितले की, “सकाळी सहाच्या सुमारास रिया कुमारी आपल्या कुटुंबासोबत बागनान पोलीस स्टेशन हद्दीतील महिश रेखाजवळ थांबली होती. त्याचवेळी तिघांनी त्यांच्यावर हल्ला करून सामान लुटण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीच्या पतीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, बदमाशांनी रिया कुमारीवर गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, पती प्रकाश कुमार याने अभिनेत्रीला कारमध्ये नेले आणि मदतीच्या शोधात सुमारे तीन किलोमीटर भटकले. कुलगचिया पिरताळा येथे महामार्गाच्या कडेला काही लोक त्यांना दिसले असता त्यावेळी त्यांनी घडलेली घटना सांगितली. यावेळी स्थानिकांनी त्यांना मदत केली आणि अभिनेत्रीला उलुबेरियाच्या एससीसी मेडिकल कॉलेजमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी अभिनेत्री रिया कुमारीला मृत घोषित केले. (big breaking jharkhand actress shot dead in west bengal howrah after failed robbery)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सीमा सजदेह मद्यधुंद अवस्थेत पाेहचलेली घरी, तेव्हा काय हाेती मुलाची प्रतीक्रिया?

अर्रर्र! अजयच्या लेकीनं कुणाला बघून ठाेकली धूम?, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा