झाडीपट्टीतील रंगभूमीचे ज्येष्ठ विनोदी नट डॉ. परशुराम खुणे यांना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परशुराम खुणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार आहेत. त्यांनी 800 पेक्षा जास्त नाटकात काम केले आहे.
कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली गावातील डॉ. परशुराम खुणे गेल्या 40 वर्षांपासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत. झाडीपट्टी रंगभूमी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया येथे कार्यरत आहे. पूर्व विदर्भातील तो भाग घनदाट अशा निबिड अरण्याचा असल्यामुळे त्याला ‘झाडीपट्टी’ हे नाव पडले. तेथे सादर होणारे नाटक म्हणजे ‘झाडीपट्टी नाटक’ असे प्रसिद्ध आहे. याची विशेषत: म्हणजे ‘झाडीपट्टीतील दादा कोंडके’ अशीही त्यांची ख्याती आहे.
डॉ. परशुराम खुणे हे गेले 15 वर्षे गुरनुलीचे सरपंच व 5 वर्षे उपसरपंच होते. याव्यतिरिक्त ते 10 वर्षांपासून झाडीपट्टी कला मंचचे अध्यक्ष असून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही करीत आहेत. त्यांना 1991ला महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर 1992ला जादूगार सुनील भवसार स्मृती पुरस्कार, 1995ला श्यामराव बापू प्रतिष्ठानच्या कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. परशुराम खुणे यांच्या ‘लग्नाची बेडी’, ‘एकच प्याला’, ‘मरीमायचा भुत्या’, ‘सिंहाचा छावा’, ‘स्वर्गावर स्वारी’, ‘मी बायको तुझ्या नवऱ्याची’, ‘एक नार तीन बेजार’, ‘लावणी भुलली अभंगाला’, ‘बायको का मातून गेली?’, ‘नाथ हा माझा’ अशा अनेक नाटकातील भूमिका प्रचंड गाजल्या. नाटय़क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात येत असल्याचे जाहिर केले आहे. (Big news! Central Govt Padma Shri Award to Parashuram Khune, actor of Jharpatti Theatre)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला तर…’, म्हणत ईशा केसकरने व्यक्त केली सिनेमाला प्राईम टाईम न मिळाल्याची खंत
वेणीमध्ये दिसणारी ही मुलगी आहे ‘टीव्ही क्वीन’, लाखाे हृदयांवर करते राज, ओळखा बरं काेण?