Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड सोनम कपूरच्या सासऱ्यांच्या फसवणुकीप्रकरणी मोठा खुलासा, टोळीने यापूर्वीच ४ कंपन्यांना केलं होतं टार्गेट

सोनम कपूरच्या सासऱ्यांच्या फसवणुकीप्रकरणी मोठा खुलासा, टोळीने यापूर्वीच ४ कंपन्यांना केलं होतं टार्गेट

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सोशल मीडियावर सतत सतत असते. सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही सतत एकमेकांसोबत त्यांचे प्रेम भरलेले क्षण सोशल मीडियावर शेअर करून नेहमीच व्यक्त करत असतात. अलीकडेच सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांच्याविषयी बातम्या आल्या होत्या की, ते सायबर फ्रॉडचे बळी ठरले आहेत. त्यांच्या ‘शाही एक्सपोर्ट’ या कंपनीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, या प्रकरणाच्या तपासात फरीदाबाद पोलीस गुंतले होते.

फरिदाबाद पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, देशातील १५ मोठी नावे या टोळीचे टार्गेट होती. ज्यांना लुटण्याचा या सायबर ठगांचा कट होता. एवढेच नाही, तर या गुंडांनी यातील चार कंपन्यांना आपले बळी बनवले आहे.

या टोळीने बनावट डिजिटल स्वाक्षरी (डीएससी) द्वारे यापूर्वी ४ कंपन्यांना फसवले आहे. या संदर्भात माहिती देताना सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी तपास सुरू आहे. या टोळीत आणखी कोणाचा समावेश आहे आणि त्यांनी आतापर्यंत कोणाला टार्गेट केले आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

याप्रकरणी आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. यासोबतच काही कंपन्यांची माहितीही पोलीस तपासत आहेत. या सायबर ठगांचे लक्ष्य कोण होते. या प्रकरणातील आरोपी संतोषने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याच्या टार्गेटवर आणखी काही कंपन्या होत्या, ज्यांना लुटण्याचा त्याचा कट होता. इन्स्पेक्टर बसंत यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी संतोषचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलसोबतही संबंध होते. तो छोटा शकीलचा शार्प शूटर राहिला आहे.

अलीकडेच सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांच्याकडून सुमारे २७ कोटींची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. हरीश आहुजाच्या फरीदाबाद येथील कंपनीची शाही एक्सपोर्ट्सने फसवणूक केल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत. फरिदाबादचे पोलिस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी सांगितले की, हरीश आहुजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबर ठगांनी एक बनावट कंपनी तयार केली आणि करोडो रुपये हस्तांतरित केले. तक्रार आल्यानंतर फरिदाबादच्या सायबर पोलिसांनी ९ जणांना अटक केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा