Saturday, March 21, 2026
Home बॉलीवूड कांतारा स्टारसोबत स्क्रीनवर भिडणार का, ‘धुरंधर’चा मेजर इकबाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बनणार चित्रपट

कांतारा स्टारसोबत स्क्रीनवर भिडणार का, ‘धुरंधर’चा मेजर इकबाल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बनणार चित्रपट

अर्जुन रामपाल हा बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असतो. तर सुपरहिट चित्रपट धुरंदर यातील मेजर इकबाल ही भूमिका त्याने साकारली होती आणि या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केला. मीडिया रिपोर्टनुसार सध्या एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे अर्जुन रामपाल यांनी आता अजून एक मोठा चित्रपट साइन केला आहे. आणि तो लवकरच कांतारा’ स्टार ऋषभ शेट्टी सोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.

अर्जुन रामपाल (Rampaal)आणि ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाची सह-निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ असणार आहे. तर यात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. ‘धुरंधर: द रिव्हेंज’मधील त्याच्या दमदार अभिनयानंतर, रामपालला या चित्रपटात मुख्य खलनायकांपैकी एक म्हणून कास्ट करण्यात आले आहे. तर हा चित्रपट 2026-2027 मधील सर्वात महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक प्रकल्पांपैकी एक मानला जातोय. तर या चित्रपटामध्ये शेफाली शाह देखील एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

ऋषभने ‘कांतारा’मध्ये उत्कृष्ट अभिनय करून प्रचंड प्रशंसा मिळवली होती. तर ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवरही उत्कृष्ट कामगिरी केली होती. ‘कांतारा’ या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टीकडून चाहत्यांच्या खूप अपेक्षा उचावल्या आहेत, तसेच आता या चित्रपटाबद्दलही ते उत्सुक आहेत. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की ऋषभ त्याच्या आगामी चित्रपटात ‘कांतारा’ची जादू पुन्हा निर्माण करू शकतो की नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

एस. एस. राजमौली यांनी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे केले कौतुक

हे देखील वाचा