Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

स्वातंत्र्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे वाढल्या कंगना रणौतच्या अडचणी, दाखल झाली आणखी एक तक्रार

बॉलिवूडची पंगा अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडते. अभिनेत्रीच्या वादग्रस्त शब्दांमुळे ती रोजच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली होती. अशास्थितीत हे प्रकरण मिटले नाही, तोच याप्रकरणी कंगनाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. वास्तविक, अभिनेत्रीविरोधात २८ डिसेंबर रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भरत सिंग यांनी या कंगनाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कंगनाच्या विरोधात दाखल झालेली आणखी एक तक्रार आता तिच्यासाठी मोठी समस्या बनू शकते. कंगनाला याआधीही तिच्या या वक्तव्यामुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणी देशाच्या विविध भागांत कंगनाच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. (controversy big trouble for kangana ranaut on her statement regarding independence another complaint filed in the case)

कंगनाच्या विरोधात ही तक्रार वकील आशिष राय आणि अंकित उपाध्याय यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. कंगना रणौतचे हे बेजबाबदार विधान मुलाखतींच्या माध्यमातून जगासमोर गेले, असे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामुळे भारतीय नागरिक, महान स्वातंत्र्यसैनिक, वीर आणि देशाच्या माजी नेत्यांच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेला आणि सन्मानाला धक्का बसला आहे.

कंगना रणौतने एका मुलाखतीत म्हटले होते की, “आम्हाला भीकमध्ये स्वातंत्र्य मिळाले आहे.” कंगनाच्या या वक्तव्यानंतर बराच वाद झाला होता. या वक्तव्यामुळे अभिनेत्रीवर सर्वत्र टीका होत होती. इतकेच नाही, तर अभिनेत्रीवर अनेक ठिकाणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा