Tuesday, July 9, 2024

चक्क ‘त्या’ अभिनेत्यासमोर अभिनेत्रीने काढले टी-शर्ट, व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

Bigg Boss 14ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या हटक्या घरात आता वाद विवाद होऊ लागले आहेत. त्याचबरोबर काही प्रेमकहान्याही आकार घेऊ लागल्या आहेत. आता याच बीग बॉसच्या घरातील काही अभिनेत्री सिद्धार्थ शुक्लाच्या दिवान्या झाल्याचे दिसत आहे. ते सिद्धार्थच्या नावाचे टॅटू गोंदवून घेताना दिसत आहेत. हा एक टास्कच होता व घरातील सर्वच सदस्यांना तो करावा लागला.

सिद्धार्थ शुक्ला हा बीग बॉसमधील सर्वात अनुभवी स्पर्धक आहे. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना त्याच्यामुळे इम्युनीटी मिळणार होती.यामुळे एक खास टास्कची योजना आखण्यात आली होती. यात सर्वांनी सिद्धार्थकडून टॅटू काढून घ्यायचा व त्याला प्रभावित करण्याचे ठरले. यात सिद्धार्थने स्पर्धकांच्या पाठीवर व पोटावर काही टॅटू काढले.

या दरम्यान एका महिला स्पर्धकाने चक्क टी शर्ट काढत सिद्धार्थला टॅटू काढायला सांगितले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यात एक स्पर्धक आपल्या पाठीवर सिद्धार्थकडून टॅटू काढत आहे असे दिसले. तर एका स्पर्धकाने पायावर टॅटू काढून घेतला. यावेळी सर्वांनी सिद्धार्थचे जोरदार कौतूक केले.

यानंतर सिद्धार्थने सारा गुरपालला सोडून बाकी सर्व स्पर्धकांना टास्कमध्ये पास केले. साराने टॅटू काढताना सिद्धार्थला सांगितले की कुणासमोरही लवकर मनमोकळं बोलत नाही. यामुळे सिद्धार्थला वाटले की ,साराचे मन नाही याचमुळे तीने सिद्धार्थला इंप्रेस करु शकली नाही.

यापुर्वी सिद्धार्थ व सारामध्ये चांगली मैत्री दिसली होती. परंतू सिद्धार्थ गेम खेळताना मैत्री किंवा दुश्मनीला बाजूला ठेवून खेळतो. हीच त्याची खासियत आहे. गेल्या हंगामातही सिद्धार्थने शहनाज गिलबरोबर असंच काहीतरी करुन सर्वांना धक्का दिला होता.

हे देखील वाचा