नवी दिल्ली। बिग बॉसच्या १४ व्या सिझनमधील स्पर्धक पवित्रा पुनिया जेव्हा बिग बॉसच्या घरात आली, तेव्हा तिने येताच सर्वांचे लक्ष वेधले आणि चर्चेचा विषय ठरली. नुकतीच तिने तिचा बॉयफ्रेंड पारस छाबडाला ‘Scandalous EX (निंदनीय एक्स बॉयफ्रेंड)’ म्हटल्यानंंतर चर्चेत आली होती. पारस छाबडाने खुलासा करत म्हटले होते की, पुनियाने त्याच्याशी विवाहत असल्याची गोष्ट लपवली होते.
आता बिग बॉस १४ सिझनमधील घरातील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये पुनिया म्हणत आहे की, तिने एकाच वेळी दोन व्यक्तींना डेट केले आहे. आणि हे सांगताना ती हसत आहे.
‘ये हैं मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीने सांगितले की, ती दोन पुरुषांशी एकसोबत चर्चा करायची. आणि दोघांनाही ती बेबी म्हणून बोलवायची. जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. शोच्या नुकत्याच एका एपिसोडदरम्यान पवित्रा पुनिया, निशांत सिंग मल्कानी, सारा गुरपाल आणि राहुल वैद्य घराच्या गार्डन परिसरात बसून चर्चा करताना दिसत आहेत. चर्चेदरम्यान पवित्राने डेटिंगबाबत खुलासा केला आहे.
शोचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पुनिया सांगत आहे की ती कशाप्रकारे दोघांशी चर्चा करायची.
हा व्हिडिओ एका युझरने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पवित्रा पुनियाची सत्यता, जी एका वेळी दोन व्यक्तींना डेट करत होती आणि त्यांना मूर्ख बनवत होती.”
यापूर्वी एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत, पवित्राने पारसला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले होते. सोबतच तिने म्हटले होते की, जर त्याच्यात थोडाही आदर आणि समजूतदारपणा असेल, तर ती त्याच्या उपस्थितीत बिग बॉस १४मध्ये पाऊल ठेवणार नाही.
यादरम्यान अशा अफवाही येत आहेत की, पारस बिग बॉस १३ची सह स्पर्धक माहिरा शर्माला डेट करत आहे. तरीही त्यांच्यापैकी कोणीही आतापर्यंत याबाबत पुष्टी केलेली नाही.