Wednesday, July 2, 2025
Home मराठी बिग बॉस १४ मध्ये एन्ट्री घेताच चर्चेत आली ‘ही’ अभिनेत्री; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

बिग बॉस १४ मध्ये एन्ट्री घेताच चर्चेत आली ‘ही’ अभिनेत्री; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!

टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’चा १४ वा सिझन आपल्या मागच्या सिझनप्रमाणेच चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. अशामध्ये बिग बॉसच्या घरात सामील झालेली निक्की तांबोळीही चर्चेचा विषय ठरत आहे. ग्रँड प्रीमियरच्या दिवशी ग्रँड एन्ट्री घेणाऱ्या निक्कीचा ग्लॅमरस लूकही समोर आला होता. चला तर मग पाहुया निक्की तांबोळीचे आतापर्यंतचे खास लूक.

निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी जांभळ्या रंगाच्या व्ही शेप प्लजिंग नेकलाईन आऊटफीटमध्ये पोहोचली होती. ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती.

सोशल मीडियावर निक्कीच्या ड्रेसला खराब कॉपी म्हणत ट्रोलही करण्यात आले. खरं तर निक्कीने जसा ड्रेस घातला होता, तसाच ड्रेस २०१८ मध्ये किंडेल जेनरने वॅनिटी फेअर ऑस्कर पार्टीमध्ये घातला होता. या ड्रेसच्या रिस्की प्लजिंग नेकलाईनमध्ये किंडेल नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.

तसं पाहिलं तर निक्की बिग बॉसच्या घरातही आपल्या स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. ती यादरम्यान हिरव्या रंगाच्या फ्लॉवर प्रिंटेड आणि कोल्ड शोल्डर ड्रेसमध्ये दिसली.

https://twitter.com/hottycelebrity/status/1314433701967802368

ती आपल्या इंस्टाग्रामवरीही आपल्या लूकचे फोटो पोस्ट करत असते.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेली ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरामध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत जवळीकमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

हे देखील वाचा