‘बिग बॉस सीझन 14’ मध्ये सर्वांचेच लक्ष वेधणारी निकी तांबोळी (Nikky Tamboli) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या बोल्डलूकने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने ती नेहमीच सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या ड्रेसने चाहत्यांची झोप उडवली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये निकी खूपच बोल्ड आणि बिंधास्त दिसत आहे. सध्या तिच्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ.
बिग बॉस फेम निकी तांबोळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. निकीने हॉटेल लॉबीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की बिंधास्त दिसत असून तिने इतका खुलून दिसणारा टॉप परिधान केला आहे की हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
या व्हिडिओमध्ये निक्कीने डेनिम जीन्ससह फिकट हिरव्या रंगाचा टॉप घातला आहे. निकीचा हा टॉप इतका खुलासा आहे की व्हिडिओमध्ये सर्वांच्या नजरा या तिच्या टॉपवर खिळल्या आहेत. निक्की तांबोळीचा हा व्हिडिओ हॉटेलच्या लॉबीमधला आहे. जिथे ती हा टॉप परिधान करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये निकी खूप आनंदी दिसत आहे. निकीचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.
निक्की तांबोळीने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हॅशटॅगवरून हा व्हिडिओ दुबईचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान निक्की तांबोळी ही साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे, परंतु ‘बिग बॉस 14’ नंतर तिने लोकप्रियता मिळवली. निक्की ‘बिग बॉस 14’ जिंकू शकली नसली तरी तिची फॅन फॉलोइंग कमालीची वाढली आहे. या शोनंतर निक्की ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही दिसली होती ज्यामध्ये चाहत्यांना तिचे काम खूप आवडले होते. निक्की शेवटची ‘दिल किसी से’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.