Wednesday, July 3, 2024

…म्हणून राहुल वैद्यला येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या, प्रवक्त्याने उघड केलं कारण

‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यानंतर राहुल वैद्य एकापाठोपाठ एक प्रोजेक्ट्समध्ये सतत व्यस्त आहे. अलीकडेच नवरात्रीला लक्षात घेऊन त्याचे ‘गरबे की रात’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे भूमी त्रिवेदीने राहुलसोबत गायले आहे. या गाण्यात राहुलसोबत निया शर्मा आहे. आता त्यांच्या या गाण्यावरून वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. गाण्यात ‘श्री मोगल मां’चा उल्लेख आहे. या देवीची गुजरातमध्ये पूजा केली जाते. गाण्यात आई देवीचा वापर काही भक्तांना योग्य वाटला नाही. यानंतर त्यांनी या गाण्यासह राहुल वैद्यला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. राहुलला अनेक मेसेज आणि धमकीचे फोन येत आहेत. ज्यात लोक त्यातील  देवीचे नाव काढण्यास सांगत आहेत. काही लोक वेगवेगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्मवर या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

राहुल वैद्यच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, “होय हे खरे आहे की, काल रात्रीपासून यासंदर्भात मेसेज आणि कॉल्सची संख्या वाढली आहे. मेसेजमध्ये लोक हत्येबद्दल बोलत आहेत. राहुल वैद्यला जीव मारण्याचे आणि त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याबाबत बोलत आहेत. आम्ही देवीचा आदराने उल्लेख केला आणि कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देश नव्हता. एका विशिष्ट वर्गाला गाण्यात आई देवीचे नाव आवडत नाही हे लक्षात आल्यावर, आम्ही त्याचा आदर करतो आणि आमच्या स्तरावर, ते दुरुस्त करण्यासाठी काम करत आहोत.”

https://youtu.be/EwbaXNzS0jI

प्रवक्ते पुढे म्हणाले की, “आम्ही सर्वांना विनंती करतो की, आम्हाला काही दिवस द्या, कारण ज्या व्यासपीठावर आम्ही गाणे प्रदर्शित केले आहे. त्यात सुधारणा समायोजित करण्यासाठी किमान काही दिवस लागतील. आम्ही प्रत्येकाच्या भावनांचा आदर करतो. ज्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे, आम्ही ती सुधारण्याच्या दिशेने परिश्रमपूर्वक काम करत आहोत.”

‘गरबे की रात’ हे राहुल वैद्य आणि भूमी त्रिवेदी यांनी गायले आहे. ८ ऑक्टोबर रोजी हे गाणे प्रदर्शित झाले आहे. निया शर्मा आणि राहुल वैद्य यांनी या म्युझिक व्हिडिओमध्ये परफॉर्म केला आहे. निया आणि राहुल वैद्य गाण्याच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस १५’ च्या पहिल्या ‘वीकेंड का वार’ भागात आले होते. कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या गाण्यावर गरबाही केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! निया शर्माच्या बॅकलेस टॉपने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; राहुल वैद्यनेसोबत दिली हटके पोझ

-‘तू कपडे तरी कशाला घालते?’, बोल्ड लूकमुळे निया शर्मा पुन्हा आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-‘धकधक गर्ल’ने शेअर केला गरबा व्हिडिओ, मनमोहक एक्सप्रेशन्स पाहून हरपलंय चाहत्यांचं भान

हे देखील वाचा