Saturday, April 5, 2025
Home मराठी बिग बॉस १४च्या पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेत ट्विस्ट; टास्कदरम्यान सीनियर कंटेस्टेंटमध्ये चांगलीच जुंपली

बिग बॉस १४च्या पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेत ट्विस्ट; टास्कदरम्यान सीनियर कंटेस्टेंटमध्ये चांगलीच जुंपली

प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनमध्ये मंगळवारी (६ ऑक्टोबर) नॉमिनेशनची प्रक्रिया झाली, यामध्ये बिग बॉसने एक नवीन ट्विस्ट दिला. बिग बॉसच्या मते सर्व फ्रेशर्स नॉमिनेटेड आहेत. तरीही, एक टास्क देऊन ते स्वत: ला यामध्ये सुरक्षित करू शकतात आणि शोमध्ये आपले स्थान निश्चित करू शकतात. या टास्कचे नाव जूल थीफ होते. यामध्ये वरिष्ठ स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांचाही समावेश होता.

टास्कदरम्यान गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यात भांडण होते आणि हे भांडण इतके वाढते की गौहर खानसह सिद्धार्थही आपला आवाज वाढवतो. अशामध्ये गौहर खान म्हणते की, ज्याप्रकारे तू ओरडू शकतो, तसेच मीदेखील ओरडू शकते.

शोच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी गौहर खानने सिद्धार्थ शुक्लासाठी म्हटले होते की, त्याला अपशब्द वापरण्याची अडचण आहे. त्याला आवडत नाही जेव्हा कोणताही व्यक्ती आपला आवाज चढवून बोलतो आणि रागात असंतुलित होतो. त्याला समजत नाही की तो नेमकं काय करत आहे.

जैस्मिन भसीन, निशिकांत सिंह मल्कानी, राहुल वैद्य, निक्की तंबोली, पवित्र पुनिया, अभिनव शुक्ला, जान सानू, शहजाद देओल आणि सारा गुरपाल या स्पर्धकांनीही बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. यांपैकी रूबीना दिलैकला सध्या बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळालेली नाही. ती अद्याप रिजेक्टेड स्पर्धक आहे.

हे देखील वाचा