बिग बॉस १४ चा सिझन जसा पुढे जात आहे, तसा यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. या आठवड्यात चार स्पर्धक नॉमिनेटेड झाले होते. त्यामध्ये निशांत सिंग मल्कानी, रुबीना दिलैक, कविता कौशिक आणि जास्मीन भसीन यांचा समावेश होता. परंतु यावेळी रविवारी नाही तर सोमवारी बिग बॉसच्या दोन स्पर्धकांना फटका बसला. हे दोन्ही स्पर्धक या सिझनमध्ये बिग बॉसच्या घराबाहेर झाले. यातील एका स्पर्धकाची बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांमध्ये निशांत सिंग मल्कानी आणि कविता कौशिक यांचा समावेश आहे.
अशाप्रकारे झाले बिग बॉसच्या घरातून बाहेर
बिग बॉसने घरातील व्यक्तींना म्हटले होते की, यावेळी रेड झोनमध्ये उपस्थित सदस्यांच्या भविष्याचा निर्णय ग्रीन झोनमधील सदस्य घेतील. सोबतच ग्रीन झोनच्या सदस्यांना हे सांगण्यात आले की रेड झोनचे कोणते सदस्य कमी मनोरंजक आहेत. ज्या स्पर्धकाचं नाव सर्वाधिक वेळा घेतले जाईल, तो बाहेर जाईल. जर प्रेक्षकांचा निर्णय आणि ग्रीन झोनमधील सदस्यांचा निर्णय एक राहिला, तर शोमधून एक स्पर्धक बाहेर जाईल. प्रेक्षक आणि घरातील सदस्यांचा निर्णय एकसारखा राहिला नाही, तर दोन स्पर्धक घरातून बाहेर होतील.
बिग बॉसच्या घराच्या घोषणेनंतर पवित्रा पुनिया, राहुल वैद्य, जान कुमार सानू, अभिनव शुक्ला, शार्दुल पंडित आणि एजाज खानने निशांत सिंग मल्कानीचे नाव घेतले. दुसरीकडे नैना सिंगने कविता कौशिकचे नाव घेतले. अशाप्रकारे ग्रीन झोनच्या सात सदस्यांनी निशांतचे नाव घेतल्यामुळे त्याला घरातून बाहेर जावे लागले.
प्रेक्षकांच्या निर्णयावरून ठरले या स्पर्धकाचे भविष्य
काही वेळानंतर प्रेक्षकांचा निर्णय आला. बिग बॉसने एजाज खानला सूटकेस उघडण्यास सांगितले. त्यामध्ये प्रेक्षकांचा निर्णय लिहिला होता. प्रेक्षकांनी सर्वात कमी मते कविता कौशिकला दिली होती. त्यामुळे कविताही घरातून बाहेर पडली. कविता वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत बिग बॉसच्या घरात आली होती.
कविता जेव्हा शोमध्ये आली होती, तेव्हा तिने म्हटले होते की, एजाज तिचा चांगला मित्र आहे. परंतु घरातून बाहेर पडताना तिने एजाजची भेटही घेतली नाही. त्यानंतर एजाजने पवित्राला म्हटले की, त्याला वाईट वाटत आहे की कविता त्याला न भेटताच निघून गेली. दुसरीकडे नॉमिनेशनपासून रुबीना आणि जास्मीन वाचले.
वाचा-
-Bigg Boss 14: नेपोटिझमबाबत प्रश्न झाले उपस्थित; सलमान खानने दिले शाहरुखचे उदाहरण, म्हणाला…
-Bigg Boss 14: ‘मांडीवर येऊन बसली…’, शार्दुल पंडितच्या वक्तव्यावर कडाडली माजी स्पर्धक