कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रियॅलिटी शो बिग बॉसला शनिवारी सुरुवात होणार आहे. यात राधो मॉंपासून ते गायक कुमार सानूच्या मुलांपर्यंतच्या नावांची चर्चा आहे. रुबीना दिलाइक, अभिनव शुक्ला, जॅस्मिन भसीन, निशांत सिंह मलखानी, सारा गुरपाल, निक्की तंबोळी, राहुल वैद्य, शार्दुल पंडित, शहजाद पोल, नैना सिंग, प्रतीक सहजल, पवित्रा पुनिया हे स्पर्धकही यावेळी बिग बॉसच्या घरात दिसू शकतात.
परंतू सध्या सर्वाधिक चर्चा जर कुणाची होत असेल तर ती आहे पवित्रा पुनियाची. भारतीय टिव्ही जगतातील एक मोठा चेहरा म्हणून म्हणून पवित्रची ओळख आहे. ती निगेटिव्ह भूमिकांसाठी टिव्ही जगतात ओळखली जाते. पवित्र पुनिया सतत तिच्या वैयक्तिक जिवनात सुरु असलेल्या गोष्टींमुळे चर्चेत असते. आजपर्यंत अनेक अभिनेत्यांबरोबर तिचे नाव जोडले गेले आहे. मीडियामधील काही रिपोर्टनुसार ती २०१५मध्ये बोहल्यावर चढणार होती. तिचा साखरपुडा एका मोठ्या उद्योगपतीशीही झाला होता परंतू कुठे माशी शिंकली कळालीच नाही व तिचं हे नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.
त्यानंतर ती पवित्रा पारसा छाबडासोबत नात्यात गुंतली होती. त्यांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतू पुन्हा एकदा पवित्रचे ब्रेकअप झाले.पारस आकांक्षा पुरीच्या प्रेमात बुडाला व पवित्र एकटी पडली.
पवित्राला खऱ्या अर्थाने जर कुठे प्रसिद्धी मिळाली असेल ती नागिन ५मध्ये. त्यानंतर तीने बालवीर रिटर्न्समध्येही काम केले. आता याच बालवीरला रिटर्न्समधून बाहेर पडत ती बिग बॉसमध्ये येत आहे. यावेळी ती तिचा एकवेळचा प्रियकर प्रतीक सहजपालसोबत येऊ शकते. प्रतीकबरोबर ती बराच काळ रिलेशनशीपमध्ये होती.