बिग बॉसचा १४वा सिझन शनिवारी रात्री ९ वाजता सुरु होत आहे. १ ऑक्टोबर रोजीचं याची शुटिंग अभिनेता व कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानने पुर्ण केली आहे. यातील एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात सलमान खानने मास्क लावले आहे. यावेळी सलमान खानने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता.
सलमान खानने याची पोस्ट इंस्टाग्रामवर केली आहे. यात त्याने ‘बिग बॉस या शनिवारी येत आहे.’ असे लिहीले आहे. सलमानच्या या फोटोशिवाय आणखी एक फोटो लिक झाली आहे. ज्यात यावेळी भाग घेणाऱ्या दोन स्पर्धकांचे चेहरे दिसत आहेत.
सोशल मीडियावर असलेल्या द खबरीने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात टीव्ही कलाकार रुबीना दिलैक व अभिनव शुक्ला दिसत आहे. रबीना माईक हातात घेत सलमान खानला काहीतरी विचारताना दिसत आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार गोपी बहु फेम अभिनेत्री जिया मानेकही यावेळी या शो मध्ये दिसणार होती. परंतू अंतिम क्षणाला तिची डिल फायनल झाली नाही. त्यामुळे कलर्सने रुबीना व अभिनवबरोबर संपर्क केला व त्यांनीही याला तात्काळ होकार दिला.
गेल्या आठवड्यात सलमान खानने शो मध्ये भाग घेणाऱ्या जान कुमार सानू यांच्या नावाची घोषणा केली होती. ते प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचे पुत्र आहेत. यावेळी जैस्मिन भसीन, निशिकांत सिंह मल्कानी, राहुल वैद्य, निक्की तंबोली, पवित्र पुनिया आणि एजाज खान हे स्पर्धकही दिसणार आहेत. तसेच गेल्यावेळी स्पर्धकांपैकी हिना खान, गौहर खान आणि सिद्धार्थ शुक्लाही पहिल्या दोन आठवड्यांसाठी बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.