टेलिव्हीजन जगतातील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉसच्या नव्या हंगामाचा प्रिमीयर ३ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. हा १४ वा सिझन शनिवारी रात्री ९ वाजता होणार असून ११ वर्ष या रियलॅटीचा होस्ट राहिलेला सलमान खान पुन्हा एकदा त्याच भुमिकेत दिसणार आहे.
कोरोना काळात होत असलेल्या या शो मध्ये अनेक बदल दिसणार आहेत. यावेळी राधे मॉंचं नाव स्पर्धक म्हणून पुढे आल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तिच्या बिग बॉस हाऊसमधील एंट्रीवर खुद्द कलर्स चॅनेलने मोहर लावली आहे.
राधे मॉं चा सहभाग पक्का झाल्याने तिच्या मानधनावर निरनिराळे अंदाज लावले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार तिच्या मानधनाला घेऊन अनेक वृत्त समोर येत आहेत. राधे मॉंचे मानधन इतके जास्त आहे की ती या सिझनमधील सर्वात महागडी स्पर्धक बनल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक आठवड्यासाठी राधे मॉंला जवळपास २५ लाख रुपये दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी यावर या शोच्या निर्मात्यांनी मात्र कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
कलर्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम चॅनेलवरुन काही दिवसांपुर्वीच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राधे मॉं घरात प्रवेश करताना दिसत आहे. “हे घर असंच कायम राहो व बिग बॉस अशीच चांगली कामगिरी करत राहो,” असे यावेळी घरात प्रवेश करताना राधे मॉं म्हणताना दिसत आहे.