राखीने बिग बॉसमध्ये टास्क दरम्यान लावला कॉमेडीचा तडका, म्हणाली ‘अभिनवची निशानी आहे माझ्या पोटात’


बिग बॉसचा गुरुवारचा एपिसोड खूप मजेदार होता. जेथे घरातील सर्व सदस्य टाईम लूपमध्ये अडकले होते. या टास्कच्या दरम्यान राखी सावंतने कॉमेडी करून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने घरातील लोकांना एक टास्क दिले आणि असे सांगितले की जो कोणी हे काम यशस्वीरित्या पूर्ण करेल, त्याला घरातल्या सर्व गोष्टींचा वापर करता येईल. सर्वप्रथम, जो कोणी टास्कमधुन आऊट होईल, तो ऑपरेटर बनेल. त्याला टाइम क्वीन किंवा किंग घोषित केले जाईल.

बिग बॉसने टाईम लूपच्या टास्कसाठी काही कृती दिल्या होत्या. यामध्ये लाईट बंद असताना बेडवर झोपणे, संगीत संपेपर्यंत जोमाने नृत्य करणे समाविष्ट होते. तसेच, राहुलला काही सदस्यांसाठी चहा बनवायचा होता आणि निक्कीला त्याच्यासमोर कोल्ड कॉफीसाठी आग्रह करून लिविंग एरिया साफ करण्याचे काम देण्यात आले होते. तर रुबीना अभिनवला बघत पूलमध्ये पडणार व ते पाहून अलीे तिला वाचवायला जाणार होता. राखीला अभिनवची मालिश करायची होती तर अर्शीला राखीच्या कामात अडथळा आणून लगेज रूम साफ करायची होती. विकास आणि डेवोलीना यांना राखीचा मेकअप करायचा होता.

बोर्डवर लिहिलेल्या टास्कनुसार राखी अभिनवची मालिश करत होती. अभिनवला मसाज देऊन राखी त्याच्या अधिकच प्रेमात पडलेली दिसली. ती म्हणते की, ‘या हातांनी मी अभिनवची मालिश केली आहे, आता मी हे हात कधीच धुणार नाही.’  राखी जेव्हा हात धुते तेव्हा डेवोलीना तिला अडवते, तेव्हा राखी तिला सांगते की, ‘अभिनवची मालिश केल्यामुळे त्याची निशानी आता माझ्या पोटात आहे.’ या कामात राखीचा मेकअप करत असताना डेवोलीनाने राखीच्या कपाळावर अभिनवचे नाव लिहिले, त्यावर अभिनवने आक्षेप घेतला होता.


Leave A Reply

Your email address will not be published.