Monday, July 8, 2024

राखी सावंतने ‘बिग बॉस’च्या टकलाची केली मसाज, हा व्हिडिओ पाहून खळखळून हसणार प्रेक्षक

कलर्स टीव्हीचा सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 14’ काही दिवसांतच संपणार आहे. प्रत्येक स्पर्धक त्यांच्या चाहत्यांना मोहवण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहे, मग ‘एंटर्टेनमेंट क्वीन’ राखी सावंत कशी काय मागे राहू शकेल. ‘बिग बॉस 14’ ची सर्वात मोठी ‘एंटर्टेनमेंट क्वीन’ मानली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. जर राखी दररोज असे काहीतरी करत असेल तर प्रेक्षकांना गुदगुल्या करण्यासाठी ते पुरेसे आहे. कधीकधी ती कावळ्यांशी बोलू लागते, कधी ती विचित्र गोष्टी करते, परंतु तरी तिच्या चाहत्यांना ती आवडते.

कलर्सने इन्स्टाग्रामवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागातील एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राखी गार्डन परिसरात ठेवलेल्या चेहऱ्यावर तेलीने मालिश करत आहे. या व्हिडिओमध्ये राखी गार्डनमध्ये उभी असून तिने हातात एक हेअर ऑईलची बाटली घेतली आहे.

राखी त्या चेहऱ्याला बिग बॉस म्हणून बोलत आहे. ती म्हणते, “तुम्ही इथे उन्हात का झोपलात ‘बिग बॉस’, चला मी तुम्हाला तेल लावते”. यानंतर राखी मजा करत म्हणते, “‘बिग बॉस’ तुम्हाला आणखी 100 सीजन पूर्ण करायचे आहेत, फक्त 14 सीजनमध्येच तुमचे केस गेले तर पुढे काय होईल”. यानंतर, राखी त्या चेहर्‍यासोबत आणखी मस्ती करते. राखीचा हा व्हिडिओ बराच मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही स्वता: ला हसण्यापासून रोखू शकणार नाहीत.

राखी सावंत फिनाले वीकमध्ये पोहोचलेल्या पाच स्पर्धकांमध्ये सामील झाली आहे. नुकतीच राखी 14 लाख रुपयांचा चेक फाडून फिनाले वीकमध्ये पोहचली. राहुल वैद्य, निक्की तांबोळी, रुबीना दिलैक आणि अली गोनी अशी राखीसोबत फिनालेमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांची नावे आहेत. या पाचपैकी एक स्पर्धक बिग बॉस 14 ची ट्रॉफी जिंकणार हे मात्र पक्के.

हे देखील वाचा