Friday, March 13, 2026
Home अन्य काय सांगता! ज्या दिवशी राखीचे लग्न झाले त्याच दिवशी तिचा नवरा पळून गेला

काय सांगता! ज्या दिवशी राखीचे लग्न झाले त्याच दिवशी तिचा नवरा पळून गेला

कॉंट्रोव्हर्सी क्वीन म्हणून राखी सावंत ओळखली जाते. राखी आणि कोणताच वाद नाही असे कधीच होत नाही. राखीने मागच्याच महिन्यात बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. तिच्या या एन्ट्रीमुळे या शो मध्ये एक वेगळीच रंगात यायला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या एका भागात राखी, अभिनव शुक्ला, रुबिना दिलेक आणि निकी तांबोळी गार्डन एरियामध्ये बसलेले असताना अचानक राखीने त्या तिघांना तिच्या नवऱ्याबद्दल आणि तिच्या लग्नाबद्दल सांगण्यास सुरुवात केली.

राखी त्या तिघांसोबत बसलेली असताना अचानक भोजपुरीत ती म्हणते, ‘ए हमरे पतिदेव, जाओ तुमको तलाक देना है तो देख लो। दे देना। हम नहीं डरते तुमसे, जाओ.’

हे ऐकून अभिनव आश्चर्यचकित होऊन तिला विचारतो ‘तू असे का बोलते?’

तेव्हा राखी तिची लग्नाची स्टोरी सांगते. ती म्हणते, ” मी माझ्या नवऱ्याला लग्नासाठी तीन वेळेस बोलवले होते मात्र तो आला नाही. आमचे लग्न झाल्यानंतर पुढच्याच तीन तासात त्याने मला घटस्फोटाची धमकी दिली. मला तो त्याच रात्री सोडून निघून गेला होता. आमच्या लग्नानंतर तो आणि मी वेगवेगळ्या रूममध्ये होतो.”

माझ्या मेकअप आर्टिस्टने माझ्या नकळत माझ्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर टाकली आणि तीन तासातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. माझ्या घराखाली मीडियाने गर्दी केली होती. खालून सतत मला माझ्या मॅनेजरचे फोन येत होते की, मीडियाला आत सोडायचे का? मी नाही सांगितले. तेव्हा त्याने माझ्यावर चिडत मला बोलायला सुरुवात केली, ‘तुझ्यामुळेच असे होत आहे, माझा एक सुद्धा फोटो मीडियामध्ये यायला नको. तिथल्या तिथे त्याने मला चार वेळा घटस्फोटाची धमकी दिली होती. त्याक्षणी मी माझ्या नवऱ्याची खूप माफी मागितली. त्याच्या समोर हातपाय जोडले आणि त्याला सांगितले की, मी सर्व सांभाळून घेते तू शांत राहा. मी त्याला प्रॉमिस केले की त्याचा एक पण फोटो मीडियामध्ये येणार नाही. त्यानंतर तो निघून गेला तो आजतागायत आला नाही. मी त्याला फोन केल्यावर तो नेहमी सांगतो मी येतोय येतंय पण तो येत नाही. ”

त्यानंतर राखी कन्फेशन रूममध्ये जाते आणि रडत रडत बिग बॉससमोर सांगते की, ‘मला माझ्या नवऱ्याला पाहायचे आहे, मी जेव्हा इतर मुलींना त्यांच्या नवऱ्यासोबत बघते तेव्हा मला खूप वाईट वाटते.’

हे देखील वाचा