बिग बॉसच्या १४ व्या सिझनला सुरुवात झाली आहे. आणि या शोच्या सुरुवातीलाच असे काही घडले आहे जे यापूर्वी कधीच पाहिले नसेल. शोच्या सुरुवातीलाच ४ स्पर्धकांना रिजेक्ट करण्यात आले आहे. त्यांना बिग बॉसमध्ये यावेळी विशेष म्हणून बोलावण्यात आलेल्या वरिष्ठ स्पर्धकांनी रिजेक्ट केले आहे. दुर्दैवाने या ४ स्पर्धकांना रिजेक्ट करण्यात आले आहे त्यातील एक नाव हे जान कुमार सानूचे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजेक्ट केलेल्या स्पर्धकांच्या यादीत आल्यानंतर जान कुमार सानूने आपला लूक बदलला आहे. त्याने आपले अर्धे केस कापले आहेत आणि एकदम वेगळा लूक घेतला आहे. त्याचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बिग बॉसच्या घरातील फोटो शेअर करणाऱ्या द खबरीने ट्विटरवर जान कुमार सानूचे लेटेस्ट फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो डिसेंटवरून थेट कूल लूकमध्ये बदलेला दिसत आहे. या फोटोंमध्ये जान कुमार सानू कुकिंग करताना आणि घरातील इतर काम करताना दिसत आहे.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार जान कुमार सानूने हे सर्व आपल्या पुढील टास्कसाठी केले आहे. वृत्तांमध्ये हेही समोर आले आहे की, रिजेक्ट स्पर्धकांमध्ये जान कुमार सानू, निशांत सिंग मलकानी आणि सारा गुरपाल यांना बिग बॉसच्या मुख्य घरात एन्ट्री मिळेल, तर रूबीनाला अद्यापही बाहेरच राहावे लागेल. टास्कबाबत वरिष्ठ स्पर्धक आणि रूबीना यांच्यामध्ये मतभेद पाहायला मिळाले, ज्यामुळे त्यांना बाहेर ठेवण्यात आले.
वडील कुमार सानू यांची साथ मिळाली
बॉलिवूडचे दिग्गज गायक कुमार सानू यांचा मुलगा जानच्या बिग बॉसमध्ये आल्याने पहिल्या दिवसापासूनच चर्चा सुरू झाली होती. जान बिग बॉसचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याला बिग बॉसमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी वडील कुमार सानूकडून काही टिप्सदेखील मिळाले आहेत. ते आपल्या मुलाला सुरुवातीपासूनच पाठिंबा देत आहेत आणि ते आपला मुलगा जानला पाठिंबा द्यावा यासाठी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना विनंती करत आहेत. जान कार्यक्रमाचा होस्ट आणि सुपरस्टार सलमान खानचाही खूप मोठा फॅन आहे.