Friday, July 5, 2024

दिलदार ‘भाईजान!’ ‘बिग बॉस १४’ चा उपविजेता राहुल वैद्यला सलमान खानकडून झक्कास गिफ्ट, सिंगरने अशाप्रकारे मानले आभार

बॉलिवूडमध्येे असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या उदारपणासाठी ओळखले जातात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे ‘भाईजान’ सलमान खान होय. त्याला जर कोणीही आवडले, तर तो त्याच्यासाठी काहीही करण्यास मागे- पुढे पाहत नाही. सोबतच तो महागड्या भेटवस्तू देण्यासाठीही ओळखला जातो. बॉलिवूड कलाकारांचे लग्न असो किंवा मग कोणाचा वाढदिवस, यादरम्यान येणाऱ्या भेटवस्तूंमध्ये सलमानच्या भेटवस्तू लक्षवेधी असतात. याचा प्रत्यय अनेकवेळा आला आहे. असेच काहीसे बिग बॉस १४ चा उपविजेता आणि गायक राहुल वैद्यबाबतही घडले आहे. सलमानकडून राहुलला खास भेट मिळाली आहे. त्यासाठी त्याने त्याला धन्यवादही दिला आहे.

राहुल आणि सलमान यांच्यातील ताळमेळ बिग बॉसदरम्यानही पाहायला मिळाला होता. ज्यावेळी विजेत्याची घोषणा झाली, त्यावेळी तो राहुलसोबत स्टेजवर दिसला होता. तरीही, राहुल विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावावर करू शकला नव्हता. परंतु त्याला चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले आणि तो सलमानचे मन जिंकण्यात यशस्वी ठरला. आता सलमान खानचे आभार मानत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

खरंतर राहुलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने एका सायकलसोबत आपला फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘शेवटी सलमान खानद्वारे गिफ्ट केलेली ई-बाईक चालवली. हा अनुभव खूपच शानदार होता आणि मला बाहेर येऊन कार्डिओ करणे खूप आवडते.’

बिग बॉस १४ संपल्यानंतरही राहुल चांगलाच चर्चेत असतो. राहुलने हा फोटो शेअर करत माध्यमांचेही लक्ष वेधले
आहे. चाहत्यांकडून त्याच्या या फोटोंवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत.

सलमान खानबदद्ल बोलायचे झाल्यास, बिग बॉस १४ ची फायनालिस्ट राहिलेल्या राखी सावंतचीही त्याने मदत केली आहे. राखीच्या आईला कँसर झाला आहे. ही माहिती मिळताच सलमान खान तिच्या मदतीसाठी पुढे आला. राखीने सोशल मीडियामार्फत त्याचे आभारही मानले होते.

नुकताच सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तो ‘वर्ल्ड डाउन सिंड्रोम डे’च्या निमित्ताने अपंग मुलांसोबत डान्स करताना दिसत होता. हा व्हिडिओ कोरोना व्हायरसपूर्वीचा होता, यामध्ये सोनाक्षी सिन्हाही दिसत होती.

सलमान खान ‘बिंग ह्युमन’ नावाची चॅरिटेबल ट्रस्ट चालवतो, ज्यामार्फत तो गरजू व्यक्तींची मदत करतो.

हे देखील वाचा