Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

Big Boss 14: सलमान खानने घेतला ‘या’ कंटेंस्टेंटचा समाचार; म्हणाला, ‘ताट घेऊन भीक…’

रिऍलिटी शो बिग बॉस 14 मध्ये प्रत्येक आठवड्यात नवीन नवीन ट्विस्ट येत आहे. तसेच शोचा होस्ट सलमान खान हा प्रत्येक विकेंडला कोणा न कोणाची क्लास घेतो. या शनिवारी होणाऱ्या विकेंडच्या वारमध्ये सलमान हा अभिनव शुक्लाचा समाचार घेताना दिसला. कॅप्टन्सी टास्कबाबत सलमानने अभिनवला खडसावले आहे.

कलर्स टीव्ही चॅनेलने बिग बॉस 14 च्या निगडीत एक व्हिडिओ प्रोमो प्रसारित केला आहे. हा विडिओ शनिवारी (21 नोव्हेंबर) होणाऱ्या विकेंडच्या वारचा आहे या विडिओमध्ये दाखण्यात आले आहे की सलमान अभिनवची क्लास घेतोय. या विडिओमध्ये सलमान कॅप्टनसी टास्कमध्ये झालेल्या घडामोडी बद्दल बोलतोय.

सलमान अभिनवला बोलतो की, ‘तू घरातील व्यक्तींना सांगितलं मला कॅप्टन बनवा मी रूबीनाला वाचवेल. याने काय होतं तू वाचतो आणि रुबीना सगळ्यांच्या नजरेत येते. तू काढता पाय घेऊन निघून जातोस आणि रूबीना वारंवार नॉमिनेट होतेय.’

यात अभिनव त्याची असहमती दर्शवतो. प्रोमोमध्ये पुढे दाखवले आहे की सलमान अभिनवला सांगतो की, ‘तुला ताट घेऊन भीक मागायची गरज नाही. एखादी बायको नवऱ्याचं नाही ऐकणार, तर ते कसे दिसेल.’

त्यानंतर रूबीनाने आपली बाजू मांडताना म्हटले की, ‘मी खूप ठिकाणी माझी असहमती दर्शवते पण मी धर्म संकटात सापडते.’

सोशल मीडिया वर बिग बॉस 14 चा हा प्रोमो खूप व्हायरल होत आहे. बिग बॉस प्रेमींना हा विडिओ खूप आवडत आहे. गुरुवारी झालेल्या एपिसोड मध्येही अभिनवने पत्नी रूबीनाला तिची मैत्रीण जास्मिनसोबत गेम प्लॅन वर चर्चा करायला समजावलं होत. त्याने तिला सांगितलं, बिग बॉसच्या घरात राहणं चांगल नाही. पण योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. या गोष्टी वरून मोठी चर्चा रंगली होती.

हे देखील वाचा