Monday, June 23, 2025
Home मराठी Bigg Boss १४: स्वत: सलमान खानने दिला होता ‘या’ अभिनेत्रीला रिलेशनशीपबद्दल मोलाचा सल्ला

Bigg Boss १४: स्वत: सलमान खानने दिला होता ‘या’ अभिनेत्रीला रिलेशनशीपबद्दल मोलाचा सल्ला

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टेलीव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’ च्या १४ व्या सिझनला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. शोच्या सुरुवातीपासूनच स्पर्धकांमध्ये मजा- मस्करी, भांडणे पाहायला मिळत आहेत. सोबच या हंगामात माजी स्पर्धक गौहर खान, हिना खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांनीही वरिष्ठ स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. ‘बिग बॉस ७’ ची विजेता राहिलेली अभिनेत्री गौहर खान त्या सिझनमध्ये एक मजबूत स्पर्धकासोबतच बिग बॉसच्या घरात कुशाल टंडनबरोबरच्या वाढत्या जवळीक मुळेही चर्चेचा विषय ठरली होती.

‘बिग बॉस’ च्या सिझन ७ मध्ये कुशाल टंडन आणि गौहर खान यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. शोदरम्यान ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी बनली होती. तरी शो संपल्यानंतरही काही काळापर्यंत यांच्यात संबंध होते. परंतु त्यानंतर कुशाल आणि गौहर यांचे ब्रेकअप झाले. दुसरीकडे ३ ऑक्टोबरला ‘बिग बॉस १४’ च्या ग्रँड प्रीमियरदरम्यान शोचा होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने गौहरला आपण दिलेला सल्ला आठवून दिला.

खरंतर, ‘बिग बॉस १४’ च्या प्रीमियरदरम्यान गौहरने म्हटले होते की, ‘तिने शोमध्ये नेहमीच आपल्या मित्रांची साथ दिली आहे आणि त्यांच्यासाठी घरही सोडले होते.’ गौहरच्या या वक्तव्यावर सलमान खानने तिला म्हटले की, “तुला मी रिलेशनशीपबद्दल सल्ला दिला होता. परंतु तू तो सल्ला ऐकला नाही.”

कुशाल टंडनपासून दूर झाल्यानंतर गौहर खान सध्या गायक इस्माल दरबार यांचा मुलगा जैद दरबारसोबत आपल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते गौहर आणि जैदच्या जोडीलाही पसंती देत आहेत.

हे देखील वाचा