बॉलिवूडप्रमाणेच कलर्स टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’ १४ सिझनमध्येही नेपोटिझमची चर्चा रंगू लागलीय. बिग बॉसच्या १४ सिझनमधील स्पर्धक राहुल वैद्यने जान कुमार सानूवर नेपोटिझमबाबत कमेंट केली होती. यानंतर विकेंडला शोचा होस्ट आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नेपोटिझमबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. सलमानने बॉलिवूडच्या शाहरुख खान, अक्षय कुमारसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांची उदाहरणे देत राहुलला प्रश्न विचारले. त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र राहुलला देता आली नाहीत.
…तर त्याला नेपोटिझम म्हणता येईल का?
सलमान खानने राहुल वैद्यला म्हटले की, “तुमचे आई-वडील तुमच्यासाठी काही करत असतील, तर त्याला नेपोटिझम म्हटले जाईल का? या इंडस्ट्रीमध्ये एखाद्याच्या मुलाला कुणावरही थोपता येणे शक्य आहे का? इंडस्ट्री अशाप्रकारे चालत नाही.”
स्वत:च्या हिमतीवर ओळख केली निर्माण
यावेळी सलमान खानने संजय दत्त, सनी देओल आणि ऋषी कपूर या दिग्गज अभिनेत्यांची नावे घेतली. त्याने म्हटले की, “या अभिनेत्यांच्या वडिलांनी त्यांना इंडस्ट्रीमध्ये आणले, परंतु त्यानंतर त्यांनी स्वत:च्या हिमतीवर आपली ओळख निर्माण केली. यामध्ये चुकीचं काय आहे?”
अजय देवगण मोठा स्टार बनला आहे- सलमान खान
सलमान खानने पुढे अजय देवगणबद्दल बोलताना म्हटले की, “अजय देवगणचे वडील ऍक्शन डायरेक्टर होते, ते नंतर दिग्दर्शक बनले. आज अजय एक मोठा स्टार बनला आहे. तो आपल्या अभिनयाच्या जोरावर तो तिथपर्यंत पोहोचला आहे.”
शाहरुख खान, अक्षय कुमार यांचे नव्हते इंडस्ट्रीशी नाते
यासोबतच सलमान खानने अशा अनेक अभिनेत्यांची नावे घेतली, ज्यांची इंडस्ट्रीशी कोणतेही नाते नव्हते. तरीही ते आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले.
त्याने शाहरुख खानबद्दल बोलताना म्हटले, “शाहरुख खान दिल्लीवरून येथे आला. अक्षय कुमार ज्याचे इंडस्ट्रीशी कोणतेही नाते नव्हते. मेहनतीच्या जोरावर हे सर्व २०- ३० वर्षांपासून येथे टिकून राहिले आहेत. इतक्या वर्षांपासून ते इथे आहेत. कारण त्यांनी तितकी मेहनत घेतली आहे.”
“जॅकी श्रॉफला इंडस्ट्रीमध्ये आणण्याचे श्रेय देव आनंद यांना जाते. ज्यामध्ये प्रतिभा असेल तो टिकेल आणि ज्यामध्ये प्रतिभा नसेल तो टिकणार नाही. तो आपल्या स्वत: चे, कुटुंबाचे आणि आई- वडिलांची तिजोरीही रिकामी करेल,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
सलमानने दिले स्वत:चे उदाहरण
बिग बॉसच्या एपिसोडदरम्यान सलमान खानने स्वत: चाही उल्लेख केला. त्याने आपले वडिल समीम खान यांना म्हटले होते की, किती सारे निर्माते, दिग्दर्शक त्यांच्याकडे येत असतात. ते त्याचे नाव का त्यांना सांगत नाहीत? यावर सलमानच्या वडिलांनी म्हटले होते की, “तुझ्यामध्ये ती बाब असेल, तर ते स्वत: च पाहून तुला आपल्या चित्रपटात घेतील. कोणाला नाकारायचे आणि कोणाला स्विकारायचे, हे प्रेक्षकांच्या हातात असते.”
वाचा- Bigg Boss 14: ‘मांडीवर येऊन बसली…’, शार्दुल पंडितच्या वक्तव्यावर कडाडली माजी स्पर्धक