बिग बॉस १४ सिझनला सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. यादरम्यान बिग बॉसच्या घरात भांडणे, ड्रामा, थट्टा- मस्करी हे सर्व पाहायला मिळत आहे. रविवारी (११ ऑक्टोबर) एपिसोडमध्ये शोचा होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने घरातील सर्व स्पर्धकांना फटकारत म्हटले की, सर्व १० स्पर्धक आपापले सामान बांधून घ्या. रविवारी कोणताही स्पर्धक घरातून बाहेर पडला नाही. तरीही जाता जाता सलमान खानने एक ट्विस्ट दिला.
सलमान खानने स्पर्धकांना घरातून बाहेर करण्याची जबाबदारी तिन्ही वरिष्ठ स्पर्धक सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खानवर टाकली आहे.
द खबरीने ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, सारा गुरपाल या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडू शकते. तरीही आतापर्यंत अंतिम पुष्टी झालेली नाही. द खबरीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांंनी सारा गुरपालला एलिमिनेट केले आहे. तरीही ही माहिती निश्चित होण्याची प्रतिक्षा आहे.”
According to sources #SaraGurpal has been Eliminated by seniors
Confirmation Awaited
— The Khabri (@TheRealKhabri) October 11, 2020
रविवारी जेव्हा सलमान खानने वरिष्ठांना विचारले की, कोणता स्पर्धक आतापर्यंत बिग बॉसच्या घरात फीट होताना दिसत नाही. त्यावेळी वरिष्ठांनी साराचे नाव घेतले. सलमान खाननेही वरिष्ठांच्या मतावर संमती दर्शवली होती. तरीही आता येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल की, घरातील कोणता सदस्य बाहेर होणार आहे.
कोण आहे सारा गुरपाल?
सारा गुरपाल पंजाबची गायिका आणि अभिनेत्री आहे. तरीही पहिल्या आठवड्यात सारा घरात काही खास कमाल करू शकली नाही. मागील सिझनमध्ये पंजाबवरून शहनाज गिल आणि हिमांशी खुरानाने भाग घेतला होता. बिग बॉसनंतर दोघींच्या लोकप्रियतेमध्ये खूप वाढ झाली. शोमध्ये शहनाज आणि हिमांशी दीर्घ काळ टिकल्या होते.