बिग बॉस १४ सध्या सुरू आहे. या घरात सध्या तुफान राडे सुरू आहेत. कुणी कुणाला मारायला जात आहे तर कुणी कुणाला शिवीगाळ करत आहे. तर कुणी कुणाच्या प्रेमातदेखील पडत आहेत. या आणि अशा अनेक बातम्या आपण ऐकतो. परंतु बिग बॉसच्या एका कर्मचाऱ्याचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याची बातमी समोर येतेय.
‘बिग बॉस १४’ साठी टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करणारी पिस्ता धाकड हिचं एका अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. शुक्रवारी १५ जानेवारीच्या रात्री ही घटना घडली आहे. सलमान खानसमवेत ‘वीकेंड का वार’ या भागाच्या चित्रिकरणानंतर, पिस्ता तीच्या एका सहाय्यकासह अॅक्टिव्हावरून घरी रवाना झाली. बिग बॉसच्या सेटच्या बाहेर येताच स्कूटर स्लिप झाली आणि २४ वर्षांच्या पिस्ताने जागेवरच दुर्दैवी .
माध्यमांतील वृत्तानुसार रस्त्यावर अंधार असल्यामुळे हा अपघात झाला. पिस्ताची अॅक्टिव्हा स्लीप होऊन एका खड्ड्यात पडली आणि गाडीवर असलेल्या दोघीही खाली पडल्या. दुसरी मुलगी उजवीकडे पडली, तर पिस्ता डावीकडे पडली, जिथे मागून एक व्हॅनिटी व्हॅन येत होती. नकळत व्हॅनिटी पिस्ताच्या अंगावरून पुढे निघून गेली आणि जागेवरच तिचा दुर्दैवी अंत झाला.
लोकप्रिय प्रॉडक्शन हाऊस एंडेमोल इंडियाची कर्मचारी असल्याने पिस्ताने ‘द वॉईस’, ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ यासह अनेक शोसाठी काम केलं होतं. कलाकारांपासून अभिनेत्री आणि इतर कर्मचार्यांपर्यंत प्रत्येकाशी तीचे चांगले संबंध होते. तिच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.