हिंदी बिग बॉस १५ आणि मराठी बिग बॉसमधील सर्वात विवादित स्पर्धक अभिजित बिचुकले त्याच्या कारामतींमुळे आणि त्याच्या सततच्या विवादित वक्त्यांमुळे प्रकाशझोतात येतो. हिंदी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सलमान विरोधात मोठ्या प्रमाणावर आरोप केले होते. शोमध्ये असताना देखील त्याला स्पर्धक आणि सलमान खानने स्वतः अनेकदा समज दिली होती. सलमान खानने तर त्याला भर शोमध्ये नीट वागण्याची तंबी देखील दिली होती. जेव्हा त्याने बाहेर आल्यावर सलमानवर आरोप लावले तेव्हा तो मोठ्या प्रमाणात मीडियामध्ये गाजला आता पुन्हा एकदा त्याने त्याच्या विधानांनी अजून एका मोठ्या कलाकाराला टार्गेट केले आहे.
बिग बॉस १५ चा सेकेंड रनरअप असलेल्या करण कुंद्राविरोधात आग ओकली आहे. अभिजित बिचकुलेने त्याला बेरोजगार म्हणत पेढ्यांची जाहिरात करण्याची ऑफर दिली आहे. यासोबतच करणला तो १५० रुपये या जहिरातीच्या बदल्यात देणार असल्याचे सांगितले आहे.
Pratik Shamita Tejaswi Umar saare acche kalakaar toh busy hain sun @KKundrra tu mere pede ka ad karega kya? 150 rupya dunga
— Abhijit Bichukale (@AbhiBichukale) February 23, 2022
अभिजित बिचुकलेने एक ट्विट केले असून, या ट्विटमध्ये त्याने उमर रियाज, तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल यांची नवे घेत करण कुंद्राला टार्गेट केले आहे. अभिजीतने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, “प्रतीक, शमिता, तेजस्वी, उमर सर्व चांगले कलाकार कामामध्ये व्यस्त आहे. ऐक करण कुंद्रा तू माझ्या पेढ्यांची जाहिरात करशील का? १५० देईल मी तुला.” स्वतःला कवी, लेखक, राजनेता सांगणारा अभिजित मिठाईच्या दुकानाचा मालक आहे.
याआधी अभिजित बिचकुले बिग बॉस १५ मधून बाहेत आल्यानंतर सलमान खान विरोधात त्याने त्याची धाडस काढली आहे. त्याला तो खूपच वाईट साईट मीडियासमोर बोलून गेला. अभिजित म्हणाला होता की. “सलमान खानने १४ सिझन केले असल्यामुळे त्याने विचार केला, की तोच हा शो चालवतो. मात्र हा १५ वा सिझन माझा आहे. तो आता इथे लहान झाला. सलमान खान तू स्वतःसाठी काय विचार केला आहे. मी लवकरच दाखवले मी काय आहे. त्याच्यासारखे १०० लोकं मी माझ्या घराच्या गल्ल्या झाडायला ठेवेल.” करण कुंद्रा लवकरच अकासा सिंगसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा –