Tuesday, July 9, 2024

Bigg Boss 15: रागाच्या भरात अफसाना खानने भिंतीवर आपटलं डोकं, बोलवावे लागले डॉक्टर

टेलिव्हिजनवरील सर्वाधिक वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ चा दुसरा ‘वीकेंड का वार’ खूप भयंकर ठरला. लेटेस्ट एपिसोडमध्ये सलमान खानने काही व्हिडिओ क्लिप दाखवल्या, ज्यात ‘तितलिया’ फेम अफसाना खान अनियंत्रित होताना दिसली. या क्लिपमध्ये ती शमिता शेट्टी आणि इतर स्पर्धकांबद्दल वाईट बोलताना दिसली. या क्लिपनंतर परिस्थिती इतकी वाईट झाली की, अफसाना स्वतःलाच मारू लागली.

बोलवावे लागले डॉक्टर
स्वतःचे गैरवर्तन पाहून अफसाना भडकली आणि तिचं डोकं दारावर जोरजोरात मारू लागली. नंतर परिस्थिती खूपच बिघडली आणि उपचारासाठी डॉक्टरांना बोलवण्यात आलं. (bigg boss 15 afsana khan brutally beats herself had to call a doctor)

सलमानने घेतली शाळा
या एपिसोडमध्ये सलमानने अफसानाचं ‘सीझनचा सुपरस्टार’ म्हणून वर्णन केलं. तो टोमणे मारत म्हणाला, “मी तुला ते सगळं सांगणार आहे, जे तू बोलली आहेस.” “शमिता म्हातारी आहे, घरी बसण्याची वेळ आहे तिची. शमिता म्हातारी झाली आहे आणि तिची निवृत्त होण्याची वेळ आली आहे, ‘घाणेरडी बाई’.”

अफसाना आणि शमितामध्ये आहे जोरदार टक्कर
घरात शमिता शेट्टी आणि अफसाना खानमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. टास्क दरम्यान, अफसाना आणि शमिता एका मुद्द्यावरून एकमेकांशी चांगल्याच भिडल्या. जसजसं टास्क पुढं सरकत गेलं, तसतसे त्यांचे मतभेद वाढले.

निराळी आहे ‘बिग बॉस’ची थीम
‘बिग बॉस’च्या सीझन १५ ची थीम साधारणपणे गेल्या सीझनच्या थीमपेक्षा खूप वेगळी आहे. यावर्षी, निर्मात्यांनी जंगल थीम सादर केली आहे, ज्यामध्ये, स्पर्धकांना मुख्य घरात प्रवेश करण्यापूर्वी जंगलात राहावे लागेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: सलमानने घेतली अफसानाची शाळा, ईशान-मायशाच्या नात्यावरही उठवले प्रश्नचिन्ह

-‘बिग बॉस १५’मध्ये अफसाना खानचं ‘जंगली रूप’; अकासा सिंगचा फाडला शर्ट, तर शमिता शेट्टीला म्हणाली ‘म्हातारी’

-‘बिग बॉस’च्या घरात सुरू झालीय ‘दंगल!’ लाथ मारून नखे ओरबडल्याचा आरोप लावत, मायशाने डोनलला केली शिवीगाळ

 

हे देखील वाचा