राकेश बापट बिग बॉस १५ चा भाग नसला तरी शमिता शेट्टी बिग बॉसच्या घरात त्याला खूप मिस करत आहे. शमिता शेट्टीची बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्यापासून ती घरात अनेक वेळा राकेश बापटचे नाव घेताना दिसली. एवढेच नाही तर शमिता शेट्टी राकेश बापटसाठी मराठी शिकतानाही दिसली. या दरम्यान, जय भानुशाली आणि शोचे इतर स्पर्धक शमिताला मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहन देताना आणि शिकवताना दिसले. जय शमिताला काही मराठी ओळी शिकवतो आणि तिला लाजाळू मुलीसारखे वागायला सांगतो.
सर्व स्पर्धक शमिता शेट्टीला तिच्या मराठी बोलण्यावरून चिडवतांना दिसले. ‘तुझा हा परफॉर्मन्स पाहून राकेश बापट शोमध्ये येईल’ असेही ते तिला म्हणाले. एवढेच नाही तर जय भानुशाली शमिता शेट्टीला राकेश बापट या नावाने चिडवतानाही दिसला, त्याने शमिताला ‘शमिता शेट्टी बापट’ म्हणून आवाज दिला.
इतकेच नाही तर, तेजस्वी प्रकाशने शमिता शेट्टीला पोहे बनवायला सांगितले कारण राकेश बापटला पोहे खायला आवडतात. यासोबतच प्रतीक आणि निशांत भट्ट देखील बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीला छेडताना दिसले. राकेश बापटचे नाव ऐकल्यावर शमिता शेट्टीच्या चेहऱ्यावर एक मोठे स्मित हस्य दिसत होते.
शमिताच्या या व्हिडिओवर राकेश बापटने कमेंट करत लिहिले, “मी पोह्यांची वाट पाहत आहे.” शमिता शेट्टीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला तेव्हा राकेश बापटने तिच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘तुला पडद्यावर पाहणे आणि तू माझ्याजवळ नसणे खूप विचित्र आहे’. मला माहित आहे की तू खूप चांगले खेळशील, चमकशील आणि आम्हा सर्वांना तुझा अभिमान वाटेल असे करशील.”
पुढे राकेश बापटने लिहिले, “मी संपूर्ण प्रवासात तुझी साथ देईल, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे आणि तुझ्या संपूर्ण प्रवासात तुला साथ देईन. तू एक प्रेरणा आहेस, खूप मजबूत, अद्वितीय आणि खरी आहेस. यासोबतच राकेश बापटने ‘शारा’ हॅशटॅग देखील वापरला आहे.
राकेश बापट आणि शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये एकमेकांच्या जवळ आले. ते दोघेही कनेक्शन म्हणून घरात होते. दोघांनी संपूर्ण सिझन एकत्र घालवला आणि यासोबतच, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही या दोघांची बाँडिंग कायम आहे. काही दिवसांपूर्वी ते डिनर डेटवर देखील गेले होते.
डिनर डेटवर गेल्यानंतर त्यांनी त्यांचा हातात हात असलेला फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला होता. फोटोच्या खाली त्यांनी कॅप्शनमध्ये “u and me” असे लिहिले होते.
याआधी राकेश बापटचे पहिले लग्न अभिनेत्री रिद्धी डोग्रासोबत झाले होते. या दोघांची पहिली भेट “मर्यादा लेकिन कब तक” या मालिकेच्या सेटवर झाली होती. २०१९ साली त्यांचा घटस्फोट झाला. राकेश हिंदी आणि मराठी मालिका, चित्रपटांमधील ओळखीचा चेहरा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’