Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अरर! ‘बिग बॉस १५’ मधील ‘या’ स्पर्धकांना चाहत्यांकडून ‘बोरिंग कंटेस्टेंट्स’चा टॅग; पाहा यादी

टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा रियॅलिटी शो ‘बिग बॉसचे १५’ वे पर्व सुरू झाले आहे. शो सुरू होऊन अवघा एक आठवडा झाला आहे. असे असले, तरीही या घरात कोण कसा खेळ खेळेल याचा अंदाज अजूनही प्रेक्षकांना लावत येत नाहीये. या शोमध्ये आता असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी प्रीमिअरच्या वेळेस खूप मोठमोठ्या गप्पा मारल्या होत्या. मात्र, अजूनही त्यांनी त्यांचे शब्द खरे केलेले दिसत नाही. यामुळेच प्रेक्षकांनी काही कलाकारांना बोरिंग असे म्हटले आहे. आता आपण त्याच पाच सदस्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रेक्षकांना बोर वाटत आहेत.

डोनल बिष्ठ
डोनल बिष्ठने पूर्ण आत्मविश्वासाने या ‘बिग बॉस १५’ मध्ये प्रवेश केला होता. घरात जाण्याआधीच तिने उमर रियाजसोबत दुश्मनी घेतली होती. प्रेक्षकांना असे वाटते होते की, डोनल घरात गेल्यानंतर सगळ्या स्पर्धकांच्या नाकी नऊ आणेल, परंतु असे काहीच झाले नाही. घरात जाताच इतर सदस्यांसमोर तिचा काही टिकाव लागलेला दिसत नाही. ती कधीतरीच स्क्रीनवर दिसते. तसेही बिग बॉसच्या हातात तिचे सगळे लक्ष गेमऐवजी तिच्या मेकअपकडे आणि लूककडे आहे. (umar riaj to donal bisht these 5 contestent boring in salman khans controversial show view)

उमर रियाझ
उमर रियाझ हा बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर घरात हंगामा करेल, अशी सगळ्यांना आशा होती. असे करण्याचा त्याने प्रयत्न देखील केला होता. प्रतीक सेहजपाल याची एन्ट्री झाल्यानंतर रियाझ खूप भडकला होता, परंतु त्याचा राग शांत झाला. त्यानंतर अफसाना खानसोबत भांडण झाल्यानंतर तो स्क्रीनवर दिसेनासा झाला. परंतु यामुळे त्याचे चाहते खूप नाराज झाले आहेत.

ईशान सहगल
ईशान सहगलने त्याच्या प्रेमकहाणी द्वारे लोकप्रियता मिळवायचा प्रयत्न केला होता. पहिल्याच आठवड्यात ईशान सहगल आणि माइशा अय्यर यांचे प्रेम जुळत होते, परंतु त्यांच्या चाहत्यांनी हे प्रेम खोटे आणि दिखाव्याचे असल्याचे सांगितले होते. सलमान खानने देखील त्याची मजा उडवली होती. त्यानंतर ते दोघे एकत्र दिसले नाहीत आणि अचानक गायब झाले.

https://www.instagram.com/p/CUpm5JVInjx/?utm_source=ig_web_copy_link

सिम्बा नागपाल
सिम्बा नागपालने घरात येत्या क्षणीच जय भानुशालीसोबत पंगा घेतला होता. त्यानंतर तो खूप चर्चेत आला होता. यानंतर सिम्बा नागपाल बिग बॉसच्या घरात १५ लोकांच्या गर्दीत हरवून गेला. मागील दोन आठवड्यापासून तो अचानक गायब झाला आहे. तो स्क्रीनवर जास्त दिसत नाही. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

आकाशा सिंग
आपल्या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांच्या राज्य करणारी आकांशा सिंग बिग बॉसच्या घरात कुठे तरी हरवली आहे.

बिग बॉसमध्ये आकाशा सिंग खूप कमी दिसते. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला बोर असे म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुर्दैवच म्हणायचं अन् काय! आर्यन प्रकरणावर शाहरुखच्या ‘या’ १० मित्रांनी पाळले मौन; केले नाही एकही ट्वीट

-‘बिग बॉस १५’मधील ‘हे’ स्पर्धक राडा घालण्यात ठरत आहे अव्वल

-भोजपुरी सुपरस्टार रवी किशनच्या सर्व सुखसोयींनीयुक्त अशा आलिशान घराचे फोटो पाहिलेत का?

हे देखील वाचा