Thursday, June 12, 2025
Home अन्य जय भानुशाली अन् प्रतीक सहजपालमध्ये भिडली दोरदार दंगल, ‘बिग बॉस’च्या घरातील काचांचा झाला चुरा

जय भानुशाली अन् प्रतीक सहजपालमध्ये भिडली दोरदार दंगल, ‘बिग बॉस’च्या घरातील काचांचा झाला चुरा

‘बिग बॉस’च्या १५व्या सीझनला ज्याप्रकारे उत्साहात सुरुवात झाली, त्याचप्रकारे पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये दंगल सुरू झाली आहे. येणाऱ्या भागामध्ये जय भानुशाली आणि प्रतीक सहजपाल यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे. साध्या बाचाबाचीनंतर दोघांमध्ये चक्क हाणामारी झाली. इतकेच नव्हे, तर या भांडणात घराच्या काचाही तुटल्या.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने नवीन टास्कची घोषणा केल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये ‘जंगलवासियांना’ एक नकाशा देण्यात आला आहे, जो काही स्पर्धकांना जंगलामध्ये टिकून ठेवण्यासाठी मदत करेल. प्रतीक सहजपाल हा नकाशा चोरण्याचा निर्णय घेतो आणि लपवतोही. यावरूनच त्याच्यात जय भानुशालीमध्ये भांडण होतं. (bigg boss 15 jay bhanushali and pratik sehajpal get voilent and break glass door)

सर्व जंगलवाले नकाशा शोधण्यासाठी मुख्य घरात जाण्याचे ठरवतात. नकाशाच्या शोधात ते सोफा, ब्लँकेट आणि बेड उचलतात. यात दरम्यान, जयला बाहेर प्रतीककडे नकाशा दिसतो. प्रतीक त्यांना बंद करतो आणि दोघांमध्ये भांडण सुरू होते. यावर करण कुंद्रा ओरडतो की, प्रतीक फिजीकल होत आहे, तर प्रत्येकजण शांतपणे काम करत आहे. वादादरम्यान प्रतीक जयची कॉलर पकडतो.

पुढे जय बिग बॉसकडे तक्रार करतो की, त्याने आदेशाचे पालन न करता, कॉलर पकडण्याची हिम्मत कशी काय केली. त्याचवेळी जय प्रतिकला धमकी देतो की, घराबाहेर अशी कॉलर पकडून दाखव. त्यानंतर तो प्रतिकला शिवीगाळ करतो. नंतर पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद आणि हाणामारी होते. करण, ईशान, निशांत आणि इतर स्पर्धक हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण दोघेही कोणाचंच ऐकत नाहीत. प्रतीक आणखी चिडतो आणि तो सातत्याने घरातील काचेच्या दरवाजावर मारतो. शेवटी ती काच फुटते.

शेवटच्या एपिसोडमध्ये देखील प्रतीक सर्वांना विनाकारण खोड्या करताना दिसला होता. जय भानुशाली, विशाल कोटिययान आणि मायशा अय्यर त्याच्या वागण्यामुळे आधीच चिडले होते. सगळेजण प्रतीकला हे पण बोलले की, तो घराचा चौकीदार आहे का? घरातील इतर सदस्यांनी प्रतीकला एक प्रकारे इशारा दिला होता की, त्याने अनावश्यकपणे पोक करणे थांबवावे. आता तर ही ‘बिग बॉस १५’ ची सुरुवात आहे. पुढे बघुयात घरात आणखी काय काय होणार ते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

-‘तिचं नाव सुद्धा आठवत नाहीये…’, रणवीर सिंगच्या गर्लफ्रेंडबद्दलच्या ‘या’ प्रश्नावर सलमान खानचं तडकीफड उत्तर

-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त

हे देखील वाचा