Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बॉसच्या घरात डोनल बिष्ट सदस्यांच्या निशाण्यावर, ‘या’ सदस्यांनी घेतला तिचा क्लास

‘बिग बॉस १५’मध्ये प्रतीक सहजपाल आणि जय उघडपणे लढत आहेत. दुसरीकडे डोनल बिष्ट आणि किचन ड्यूटी करत असलेली तेजस्वी प्रकाश यांच्यात वाद सुरू झाला आहे. बिग बॉसच्या घरातील हे दोन्ही सदस्य स्वयंपाकघर सांभाळत आहेत. यांच्यात तसे मोठे भांडण जरी झाले नसले तरी या दोघीही एकमेकींना पसंत करत नाही. डोनल अनेकदा तेजस्वीच्या मागे तिच्याबद्दल वाईट बोलताना दिसते.

तेजस्वी जयशी डोनल बिष्टबद्दल बोलताना दिसली. ती म्हणाली, “हे फक्त स्वयंपाक करण्यापुरते नाही की, तुम्ही किती चांगले जेवण करता. तर तू हे रोज किती चिकाटीने करते ते महत्वाचे आहे. शिवाय तेजस्वी विधीला म्हणाली, ‘माझा संयमाचा बांध फुटत असून मी आता तिला बोलणार आहे.’

डोनलने करण कुंद्राला घरात ड्युटीसाठी कोणाशी बोलावे असे विचारले त्यावर करणने उत्तर दिले, “मला याबद्दल माहिती नाही पण ज्या दिवशी तू स्वयंपाक केला होता तो खूप चांगला होता. पण दुपारसाठी केलेले जेवण रात्रीच्या वेळी खावे लागले. ज्याला उत्तर देताना डोनल म्हणाली, “जेवणाच्या वेळी डाळ तयार होती.”

करण कुंद्रासोबतच्या संभाषणादरम्यान, विधीने डोनलला सांगितले की, “तुला रोज स्वयंपाकघरातील ड्युटी करावी लागेल.” त्यानंतर डोनाल आणि विधी यांच्यात वाद झाला. दरम्यान, विधी डोनलवर प्रतिक्रिया देताना दिसली आणि म्हणाली की, “आम्ही २५ मिनिटांत चहा पित नाही. आपण स्वयंपाकघरातील ड्युटीत तत्पर राहावे. विधी म्हणाली मला येत नाही म्हणूनच मी तुझ्याकडे आली नाहीतर मी आले नसते.” जेव्हा डोनल शमिताशी ड्युटीबद्दल बोलत होती, तेव्हा विधी तिच्यावर रागावलेली दिसली.

करण स्वयंपाकघरात उभा राहून डोनलशी जेवणाबद्दल बोलत होता. यादरम्यान, किचन टीमशिवाय जयही तिथे उपस्थित होता. तो डोनल प्रेमाने समजावताना दिसला. पण डोनल त्याचे ऐकायला तयार नव्हती. ती करणला सांगताना दिसली की, ‘तू जे काही खाल्ले आहेस, तुझे पोट भरले ना.’ करणला डोनलची ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि त्याने डोनलला सांगितले, ‘जर असे असेल, तर स्वयंपाकघरात दुसऱ्या कोणालातरी आणा.’

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा