आतापर्यंत ‘बिग बॉस’च्या १५ व्या सीझनमध्ये मायशा आणि ईशानची लव्हस्टोरी पाहायला मिळत होती. पण आता हळूहळू तेजरन म्हणजेच तेजस्वी आणि करण कुंद्राची मैत्रीही घरात घट्ट होताना दिसत आहे. करण कुंद्रा हा या सीझनमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. करण तेजस्वीला किती पसंत करतो, हे करणने यापूर्वीच तेजस्वीला सांगितले आहे. नुकतेच तो गायिका अकासा सिंगसोबत आपल्या भावना शेअर करताना दिसला.
करणला आहे तेजस्वीवर ‘क्रश’
करणने अकासाला आपल्या मनातल्या भावना शेअर करत सांगितले की, त्याला तेजस्वी प्रकाशवर क्रश आहे. करण अकासाला म्हणाला, “तुला आधीच माहित आहे की, माझे तिच्यावर क्रश आहे. ती खूप कॉमेडी करते, गोड आहे आणि मनाची चांगली आहे.” मात्र, या भावना केवळ त्याच्याच मनात असल्याचे करणने स्पष्ट केले.
अकासाने करणशी बोलताना सांगितले की, तिच्याही मनात काहीतरी आहे, असे वाटते. ज्याला करणने उत्तर दिले की, या भावना फक्त त्याच्या मनात आहेत, तेजस्वीच्या मनात नाहीत. ती त्याला फक्त आपला सर्वात चांगला मित्र मानते. अकासाने तेजस्वीकडे इशारा केल्यावर करण म्हणाला, “तिच्याकडे इशारा नको करू.” शिवाय अकासासोबतच्या संभाषणात करणही लाजतानाही दिसला. (bigg boss 15 karan kundrra express his feeling towards tejasswi prakash says to akasa singh i have a crush on her)
अकासाने लावली पैज
करणशी बोलताना अकासा सतत सांगत होती की, तेजस्वीलाही त्याच्यावर क्रश आहे. मात्र, करणने हे मान्य केले नाही. त्यानंतर अकासाने करणसोबत एक पैज लावली, की तेजस्वीही त्याला पसंत करते. करणने सांगितलेली ही गोष्ट ती कोणालाच सांगणार नसल्याचं अकासा म्हणाली असली, तरी हे क्रश तेजस्वीच्याही मनात आहे, हे देखील ती सिद्ध करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पहिली करवाचौथ साजरी करणाऱ्या मानसी नाईकचे फोटो पाहून ‘या’ अभिनेत्रीने केले तिच्या लूकचे कौतुक
-‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत