‘बिग बॉस १५’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ‘जहर का कहर’चे टास्क सुरू आहे. शोची सुरुवात जंगलवासीयांमध्ये मशीनमधून रस काढण्याच्या स्पर्धेने झाली आहे. या टास्कमध्ये जंगलवासीयांना तीन टीम टाइगर, डियर आणि प्लांटमध्ये विभागले गेले होते. टास्कदरम्यान, जंगलवासीयांमध्ये शारीरिक हिंसा झाली. अनेक स्पर्धकांना गंभीर दुखापत झाली आहे. जेव्हा विधी पंड्या टास्कमध्ये तिचा जार वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावत होती, तेव्हा इतर सगळे जय भानुशाली, करण कुंद्रा, डोनल बिष्ट, उमर रियाज तिचे जार पाडण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, विधीला दुखापत झाली आणि डोनल देखील जखमी झाली.
दरम्यान, मायशा अय्यरलाही दुखापत झाली. तिने विधी पंड्याला वॉशरूममध्ये नेले आणि तिला विचारले की, टायगर टीमचा लीडर कोण आहे? विधीने उत्तर दिले की, “जय भानुशाली.” मायशा जयकडे जाते आणि त्याला म्हणते की, डोनल बिष्टने तिचे केस ओढले, तिच्या चेहऱ्यावर नखे मारली आणि ती तिला कोणत्याही किंमतीत सोडणार नाही. यानंतर, मायशा खूप रागावली आणि डोनलला मारण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तिथे उपस्थित स्पर्धक तिला थांबवतात, तेव्हा मायशा डोनलला शिवीगाळ करते आणि म्हणते की, डोनल तिला टास्कदरम्यान लाथ मारत होती.
डोनल करण कुंद्राला तिचे नखे दाखवते आणि म्हणते की, तिची मोठी नखे नाहीत. मग ती एखाद्याला नखाने कसे ओरखडू शकते. डोनालने सांगितले की, तिच्या चेहऱ्यावर ओरखडेही आले आहेत. डोनालने मायशाला खोटारडी असेही म्हटले. ती म्हणाली की, टास्कदरम्यान लोकांना दुखापत होते, पण तिने मायशाला दुखापत नाही केली.
त्याचवेळी, ईशान सेहगल एका कोपऱ्यात सिंबा नागपालच्या खांद्यावर डोके ठेवून रडताना दिसला. तो सिंबाला सांगतो की, जेव्हा तो टास्कदरम्यान मायशाचा बचाव करत होता तेव्हा तिने त्याला धक्का दिला. यामुळे तो दु:खी होतो आणि रडतो. तो सिंबाला सांगतो की, तो आधीच कमजोर स्थितीत आहे. ईशानने स्पष्ट केले की, त्याने मायशाची इमेज खराब न करण्यासाठी हे केले. पण तिला त्याची काळजी नाही. सिंबा ईशानला मिठी मारतो आणि भावनिक आधार देतो. तो त्याला स्वतःसाठी खेळण्याचा सल्ला देतो. तो घरात कशासाठी आला आहे यावर लक्ष केंद्रित कर असेही सांगतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–जय भानुशाली अन् करण कुंद्रामध्ये जुंपले वाद; पतीची बाजू घेत माही म्हणाली, ‘ही औरतगिरी…’
-‘बिग बॉस १५’मधील ‘हे’ स्पर्धक राडा घालण्यात ठरत आहे अव्वल
-अरर! ‘बिग बॉस १५’ मधील ‘या’ स्पर्धकांना चाहत्यांकडून ‘बोरिंग कंटेस्टेंट्स’चा टॅग; पाहा यादी