Monday, July 1, 2024

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांची यादी आली समोर; शमिता शेट्टीसह अनेक मोठे कलाकार गाजवणार पर्व

टेलिव्हिजनवर अनेक रियॅलिटी शो येतात आणि जातात. प्रत्येक शोबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप प्रेम असते. मात्र टीव्हीवर एक असा शो आहे, ज्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रेम, उत्साह, राग, दुःख, आनंद सर्व भावना असतात. तो शो म्हणजे ‘बिग बॉस’. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. या शोने लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड केले आहे. या शोचीच दुसरी ओळख म्हणजे विवादित शो.

लवकरच ‘बिग बॉस ओटीटी’ सुरु होणार आहे. पहिल्यांदाच बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. यावेळी या बिग बॉसबद्दल प्रेक्षकांना जास्त उत्साह असण्याचे कारण म्हणजे, बिग बॉसचे हे ओटीटी व्हर्जन करण जोहर होस्ट करणार आहे. सूत्रसंचालक समोर आल्यानंतर, आता शोमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून येणार याबाबत मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. मात्र आता स्पर्धकांची फायनल लिस्ट समोर आली आहे. या लिस्ट नुसार जाणून घेऊया या स्पर्धकांची नावे.

नेहा भसीन
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली जाणारी नेहा भसीन या शोमध्ये येत आहे. प्रोमो पाहून नेहा नक्कीच स्पर्धक म्हणून घरात जाणार हे आता फायनल आहे.

शमिता शेट्टी
शिल्पा शेट्टीची बहीण असलेली शमिता देखील या पर्वात स्पर्धक असणार आहे. राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर शमिता बिग बॉसमध्ये जाणार, ही बातमी ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. शमिता बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात देखील सहभागी झाली होती.

अनुषा दांडेकर
प्रसिद्ध गायिका आणि विजे असणारी अनुषा देखील बिग बॉसमध्ये जाणार आहे. करण कुंद्रासोबत तिने काही महिन्यांपूर्वीच ब्रेकअप केले आहे. अनुषाही चांगलीच लोकप्रिय आहे.

रिद्धिमा पंडित
टेलिव्हिजन अभिनेत्री रिद्धिमा पंडित देखील या शोचा भाग असणार आहे. तिचे नाव फायनल झाल्याचे मेकर्सने सांगितले आहे. या पूर्वी रिद्धिमा ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसली होती.

करण नाथ
शोने प्रदर्शित केलेल्या प्रोमोवरून अभिनेता करण नाथ देखील बिग बॉसमध्ये जाणार आहे. करणची फॅन फॉलोविंग देखील खूप तगडी आहे.

दिव्या अग्रवाल
स्प्लिट्सविला फेम दिव्या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय दिसते. तिला याआधी देखील अनेकदा शोची ऑफर मिळाली होती, आता हे पर्व नक्कीच दिव्या गाजवणार असे म्हटले जात आहे.

उर्फी जावेद
उर्फीने २०१६ पासून तिच्या करियरची सुरुवात केली आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिका गाजवल्या आहेत.

अक्षरा सिंग
भोजपुरीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग देखील या पर्वात बिग बॉसमध्ये दिसेल.

जिशान खान
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता अशी ओळख मिळवणारा जिशान अनेक मालिकांमध्ये दिसला आहे. तो एकदा एअरपोर्टवर बाथरोब घालून गेला होता.

नेहा मलिक
नेहा एक यशस्वी मॉडेल असून, ती तिच्या बिकिनी फोटोजसाठी खूप प्रसिद्ध आहे.

पवित्र लक्ष्मी

 

मल्याळम सिनेमातील अभिनेत्री असलेली पवित्रा देखील या शोमध्ये जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा