Sunday, October 6, 2024
Home अन्य ‘बिग बॉस १५’च्या प्रोमोमध्ये दिसला अकासा-तेजस्वीचा दमदार अंदाज, आकर्षक अदांनी केले सर्वांना घायाळ

‘बिग बॉस १५’च्या प्रोमोमध्ये दिसला अकासा-तेजस्वीचा दमदार अंदाज, आकर्षक अदांनी केले सर्वांना घायाळ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस १५’चा लवकरच आगाज होणार आहे. या शोमधील कन्फर्म असलेल्या ५ स्पर्धकांची नावे समोर आली असून, हळूहळू बाकी स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस १५’च्या प्रोमोमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि गायक अकासा सिंग या दोघींनी आपल्या धमाकेदार डान्सने जबरदस्त एन्ट्री केली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून चाहते ‘बिग बॉस १५’ शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अकासा आणि तेजस्वी ‘बिग बॉसच्या १५’ च्या प्रोमोमध्ये जबदस्त धमाल करताना दिसत असून, दोघी सिल्वर कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. अकासाने ‘नागिन’ गाण्यावर परफॉर्म करत आपला जबरदस्त जलवा दाखवला आहे. तर तेजस्वीने ‘पानी पानी’ गाण्यावर डान्स करत चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम व प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर चाहते या दोघींना ‘बिग बॉसच्या १५’च्या शोमध्ये पाहण्यास प्रचंड उत्सुक आहेत.

 

‘बिग बॉस १५’ शो २ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या शोमध्ये अकासा आणि तेजस्वी यांच्याव्यतिरिक्त आणखी कोण स्पर्धक असतील हे जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. तर या शोमध्ये डोनल बिष्ट, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट हे स्पर्धक दिसणार आहेत. ‘बिग बॉस १५’ चा होस्ट सलमान खान देखील आपल्या ‘टायगर ३’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण करून भारतात परतला आहे.

यापूर्वी तेजस्वी प्रकाश ‘खतरों के खिलाडी’ या स्टंट बेस रियॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. रोहित शेट्टीला तिच्या स्टंटने तिने इंप्रेस केल्यानंतर आता ‘बिग बॉस १५’ मध्ये तेजस्वी होस्ट सलमान खानचं मन कस जिंकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तेजस्वी प्रकाशने ‘स्वरागिनी-जोड़े रिश्तों के सुर’ या मालिकेमध्ये रागिणी माहेश्वरीचे पात्र साकारून तिने आपली ओळख निर्माण केली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘असं रूप आणि शृंगार असल्यास कोणासही येड लागेल’, म्हणत चाहत्यांनी केले अक्षयाच्या सौंदर्याचे कौतुक

बॉलिवूडमधील ‘या’ चित्रपटांमध्ये जेठालाल यांनी साकारल्या होत्या लहान-मोठ्या भूमिका, आज आहे टेलिव्हिजनवरील सुपरस्टार

‘या’ सुपरहिट चित्रपटांसाठी ‘या अभिनेत्री होत्या पहिली पसंती, कोणी प्रेग्नन्सीमुळे तर कोणी ब्रेकअपमुळे सोडले सिनेमे

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा